Breaking News :
राजकारण

अदानींची संपत्ती इतकी वाढली कशी? राज ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल

Gautam Adani Wealth
21

Gautam Adani Wealth : ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा पाहायला मिळाला….या मोर्चात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली…काँग्रेस, शरद पवार गट, यासह विरोधी पक्षातील नेते देखील या मोर्चात पाहायला मिळाले…यावेळी राज ठाकरेंची गर्जना पाहायला मिळाली…त्यांनी देशातील उद्योगपतींवर भाष्ट केलं…कसं भारतात फक्त एकाच उद्योगपतीला मोठं करणं सुरू आहे…त्या उद्योगपतीला जंगलं देऊन टाका, जमिनी देऊन टाका, देशातील विमानतळ, पोर्ट सर्व काही देऊन टाका…देशातील कोणतीही गोष्ट असली की द्या अदानीला, असं म्हणत राज ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली…

देशात गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे फक्त अदानीच पाहायला मिळत आहे…2014 पूर्वी कुठेही नाव नसलेले, कुणाला नावही माहिती नसलेले गौतम अदानी अचानक नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच समोर येतात….काहीच दिवसात गौतम अदानी हे मुकेश अंबानी आणि टाटा ग्रूपला मागे टाकत थेट टॉपवर जातात…जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी पोहोचतात…पण हे चमत्कार कसं घडलं? मोदी सरकारने मागील 12 वर्षात असे अनेक गौतम अदानी का तयार केले नाही? गौतम अदानीला देशातील संपत्ती कोण देत आहे?

राज ठाकरेंनी अदानींवरून मोदी सरकारला काय सवाल केला? ( Gautam Adani Wealth )

राज ठाकरेंनी निडवणूक आयोगात सुरू असलेल्या भोंगळ कारभारावर भाष्य केलं…त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली…यावेळी भाजपची जी देशात हूकूमशाही सुरू आहे, यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं…जेव्हापासून मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले आहे, तेव्हापासून कसं एकच उद्योगपती देशात श्रीमंत होत आहे…यावर राज ठाकरेंनी आज बोट ठेवलंय… एकाच उद्योगपतीला जमिनी द्या…देशातील जंगलं देऊन टाकयाचे, विमानतळ, पोर्ट, सर्व देऊन टाका…भाजपला सत्ता जाण्याची कुठीलीही भिती नाही..ना महाराष्ट्रात ना केंद्रात……घ्या जमिनी द्या अदानीला असंच सध्या सुरू दिसतंय…आमचा राग कोणत्याही उद्योगपतीवर नाही…उद्योगपती या देशाला हवेत…काँग्रेसच्या काळात अनेक उद्योगपती उभे राहिले…पण यांच्या काळात फक्त एक उद्योगपती मोठा होताना दिसत आहे…ही हिंमत आली कुठून…याच कारण सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट ताब्यात घेऊन ठेवलीये…सगळी चॅनेल्स ताब्यात घेऊन ठेवलीत..निवडणूक आयोग ताब्यात घेतलं…तुमच्यापर्यंत खऱ्या बातम्या येऊच द्यायच्या नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली…

2014 पूर्वी गौतम अदानी ( Gautam Adani ) यांचे नाव कुणालाही माहिती नव्हते, पण अचानक अदानी एवढे श्रीमंत कसे झाले, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे…2014 मध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले आणि त्यानंतरच्या काळात गौतम अदानी यांच्या संपत्तीने आणि व्यावसायिक साम्राज्याने घेतलेली भरारी जागतिक अर्थविश्वाला थक्क करणारी आहे… 2014 पूर्वी गौतम अदानींचे नाव देशातील प्रमुख उद्योगपतींमध्ये नव्हते…आंतरराष्ट्रीय नियतकालिक ‘फोर्ब्स’च्या 2014 मधील अब्जाधीशांच्या अधिकृत यादीनुसार, गौतम अदानी यांची एकूण वैयक्तिक संपत्ती सुमारे 2.8 अब्ज डॉलर्स इतकी होती… त्यावेळी जागतिक श्रीमंतांच्या यादीत ते 609 व्या क्रमांकावर होते… तर भारतातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचा क्रमांक 22 वा होता… त्या कालखंडात अदानी समूहाचा मुख्य भर कमोडिटी ट्रेडिंग, बंदरे आणि औष्णिक ऊर्जा या क्षेत्रांवर होता… जेव्हा गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते, तेव्हा गुजरातमधील ‘मुंद्रा बंदर’ हे त्यांच्या साम्राज्याचा मुख्य कणा होते… याशिवाय कोळसा आयात-निर्यात, वीज निर्मिती आणि फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत खाद्यतेल निर्मिती या पारंपारिक उद्योगांमध्ये ते प्रामुख्याने सक्रिय होते…

हेही वाचा : देशात अदानींचं साम्राज्य! जमिनीपासून आकाशापर्यंत विस्तार; राज ठाकरे कडाडले, नेमकं काय म्हणाले?

विमानतळ व्यवसायात अदानी समूहाची एंट्री कशी झाली? ( Gautam Adani Net Worth )

मात्र, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर संपूर्ण चित्र झपाट्याने बदलले… यानंतरच्या काळात अदानी समूहाने आपला व्यवसाय केवळ पारंपारिक क्षेत्रापुरता मर्यादित न ठेवता विमानतळ, सिमेंट, हरित ऊर्जा, संरक्षण उत्पादन, डेटा सेंटर्स आणि थेट माध्यम क्षेत्रात अत्यंत आक्रमकपणे विस्तारला…2014 मधील 2.8 अब्ज डॉलर्सवरून पुढील काही वर्षांत गौतम अदानींची ( Gautam Adani ) संपत्ती थेट 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडून पुढे गेली..म्हणजे काहीच वर्षात संपत्ती थेट 40 पटीने वाढली…एवढ्या जलदगतीने आजपर्यंत कुणाचीही संपत्ती वाढली नाही…. यादरम्यान त्यांनी जगातील टॉप श्रीमंताच्या यादीत असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा बहुमानही मिळवला…

अदानी समूहाच्या या ऐतिहासिक वाढीमध्ये मोदी सरकारच्या अनेक धोरणांचा थेट फायदा झाल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो… यामध्ये विमानतळ क्षेत्रातील खाजगीकरणाचे धोरण आघाडीवर आहे… केंद्र सरकारने देशातील प्रमुख विमानतळांच्या खाजगीकरणासाठी काढलेल्या निविदांमध्ये, आणि नियमात केलेल्या बदलांमुळे विमानतळ चालवण्याचा कोणताही पूर्वअनुभव नसलेल्या अदानी समूहाला कंत्राट मिळाले.. ज्यामुळे देशातील प्रमुख विमान प्रवासी वाहतूक अदानी समूहाच्या अखत्यारीत आली… याशिवाय सरकारच्या हरित ऊर्जा धोरणांतर्गत गुजरातच्या खावडा येथे जगातील सर्वात मोठ्या नूतनीकरणक्षम ऊर्जा पार्कसाठी अदानी समूहाला मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा पुरवण्यात आल्या…

अदानी समूहाच्या पोर्ट आणि सिमेंट व्यवसायाचा विस्तार

तसेच देशांतर्गत कोळसा खाणींचे कंत्राट मिळवण्यात आणि ऑस्ट्रेलियातील वादग्रस्त कोळसा खाण प्रकल्पासाठी बँकिंग सहकार्य मिळवण्यातही अदानी समूह आघाडीवर राहिला…मोदी सरकारने देशातील इतर सर्व उद्योगपतींना डावलून फक्त गौतम अदानी यांना मोठं करण्यासाठी सर्व प्रयत्न केल्याचा आरोप आहे…आज देशातील मोठे कोणतेही कंत्राट फक्त अदानींना दिले जात असल्याचा आरोप आहे…पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हाही विदेशी दौऱ्यावर जातात, याचा थेट फायदा गौतम अदानी यांना होत असल्याचा आरोप आहे…मोदींच्या मदतीनेच अदानींनी विदेशात आपल्या साम्राज्याचा विस्तार केल्याचा आरोप आहे…नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने गौतम अदानी यांच्यावर सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी कंत्राट मिळवताना कथित लाचखोरी आणि अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे आरोप ठेवून फौजदारी खटला दाखल केला होता..यावरून मोदी सरकारवर अमेरिकेने प्रचंड दाबाव आणला अशी चर्चा आहे…त्यानंतर मोदी सरकारने अमेरिकेसोबत काही वाटाघाटी केल्यानंतर ऑगस्ट 2026 मध्ये अमेरिकेच्या संघीय न्यायालयाने हा खटला पूर्णपणे फेटाळून लावून सर्व फौजदारी आरोप रद्द केले आहेत, असा आरोप आहे….

गौतम अदानी यांच्या व्यावसायिक विस्तारातील सर्वात वादग्रस्त आणि गंभीर मुद्दा म्हणजे, आधी काही मोठ्या कंपन्यांवर ED, CBI च्या माध्यमातून कारवाई करणे….आधी छापे टाकत कारवाई करणे आणि त्यानंतर काही महिन्यांतच त्या कंपन्या अदानींच्या ताब्यात जाणे…म्हणजेच केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाई नंतर काही महिन्यातच अदानी समूह त्या कंपन्या खरेदी करताना दिसतो…. विरोधकांनी याला भय दाखवून केलेले व्यावसायिक टेकओव्हर म्हटले आहे… याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, ज्याची मालकी पूर्वी ‘जीव्हीके’ समूहाकडे होती… केंद्रीय तपास यंत्रणांनी जीव्हीके समूहाच्या अध्यक्षांवर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करून त्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले… या कारवाईच्या अवघ्या काही महिन्यांनंतर, जीव्हीके समूहाने मुंबई विमानतळावरील आपला मोठा हिस्सा अदानी समूहाला विकण्यास मान्यता दिली आणि आज या विमानतळावर अदानी समूहाचे पूर्ण नियंत्रण आहे, असा आरोप आहे…

हेही वाचा : ‘व्होटचोरी’च्या आरोपांपासून दुष्काळापर्यंत; उद्धव ठाकरेंचा सरकारवर चौफेर हल्ला

अमेरिकेतील अदानी प्रकरणात 2026 मध्ये काय घडलं? ( Adani Group Growth )

असाच प्रकार आंध्र प्रदेशातील अत्यंत धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या ‘कृष्णपटनम बंदर’ बाबतीतही पाहायला मिळाला… हे बंदर नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीच्या नियंत्रणाखाली असताना कंपनीवर प्राप्तिकर विभागाने मोठे छापे टाकले…या छाप्यांनंतर काही महिन्यांतच अदानी पोर्ट्सने या बंदरामधील शेअर्स खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करून या बंदराचे पूर्ण मालकी हक्क मिळवले, असा आरोप आहे… सिमेंट उद्योगातही संघी इंडस्ट्रीज या कंपनीला विकत घेण्यासाठी सुरुवातीला ‘श्री सिमेंट’ ही कंपनी आघाडीवर होती… मात्र, अचानक ‘श्री सिमेंट’च्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले, ज्यानंतर त्यांनी या शर्यतीतून माघार घेतली… श्री सिमेंटने माघार घेताच अवघ्या काही दिवसांत अदानी समूहाच्या मालकीच्या ‘अंबुजा सिमेंट’ने संघी इंडस्ट्रीजचे अधिग्रहण करण्याची अधिकृत घोषणा केली… अगदी माध्यम क्षेत्रातही, ‘एनडीटीव्ही’ या प्रसिद्ध न्यूज चॅनेलच्या प्रवर्तकांवर सीबीआय आणि ईडी द्वारे चौकशी सुरू असताना, अदानी समूहाने एका व्यावसायिक कराराच्या माध्यमातून एनडीटीव्ही मधील प्रमुख शेअर्स अप्रत्यक्षपणे ताब्यात घेत या मीडिया हाऊसवर पूर्ण ताबा मिळवला…

म्हणजे अदानी हे श्रीमंत होण्यामागे केंद्र सरकारचा मोठा हात असल्याचा आरोप आहे….जर आज मोदी सरकार केंद्रात सत्तेत नसते तर गौतम अदानी एवढे श्रीमंत झाले नसते, असं म्हटलं जात आहे…कारण मुकेश अंबानी, टाटा ग्रूप हे काँग्रेसच्या काळापासून देशात कार्यरत आहे…विदेशातही त्यांचे मोठे जाळे आहे….मात्र तरीही ते मागे पडत गेले आणि अदानी मागून येत त्यांच्या पुढे गेले….आज गौतम अदानी एवढे श्रीमंत असले तरी त्यांच्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये थेट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 1,15,920 आहे…तर त्यांच्यापेक्षा कमी श्रीमंत असेलले टाटा समूहाकडे जगभरात आणि भारतात मिळून अंदाजे ११.६ लाख पेक्षा जास्त प्रत्यक्ष कर्मचारी कार्यरत आहेत…तर रिलायन्स समूहाकडे अधिकृतपणे सुमारे ४.२ लाख प्रत्यक्ष कर्मचारी आहेत, अशी माहिती आहे…म्हणजे कंपनी मोठी आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी, असं पाहायला मिळते…तुम्हाला काय वाटतं अदानी जेवढ्या लवकर श्रीमंत झाले, तेवढ्या लवकर भारतातील दुसरे उद्योगपती का श्रीमंत झाले नाही? गौतम अदानी मोदी सरकारच्या मदतीने श्रीमंत झाले आहे का? कमेंट करून नक्की सांगा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts