Cardiac Arrest Symptoms: कार्डिअॅक अरेस्टमुळे आज, ८ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. कार्डिअॅक अरेस्ट ही अत्यंत गंभीर आणि जीवघेणी अवस्था आहे. काही प्रकरणांमध्ये हृदय बंद पडण्यापूर्वी शरीर काही संकेत देऊ शकतं. हे संकेत वेळीच ओळखून तातडीने वैद्यकीय मदत घेतल्यास उपचारासाठी मिळणारा महत्त्वाचा वेळ वाचू शकतो.
कार्डिअॅक अरेस्टचं (Cardiac Arrest Warning Signs) नाव ऐकलं तरी अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. कारण ही स्थिती अनेकदा अचानक उद्भवते आणि मदतीसाठी मिळणारा वेळ अतिशय कमी असतो. पण शरीर अगदी शांत बसत नाही! काही प्रकरणांमध्ये हृदयाची गंभीर समस्या निर्माण होण्यापूर्वी शरीर काही संकेत देऊ शकतं.
कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे हृदयाची पंपिंग क्रिया अचानक थांबणे. यावेळी शरीरातील मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांपर्यंत रक्त व ऑक्सिजन पोहोचत नाही. ही अवस्था अत्यंत गंभीर असून तातडीच्या उपचारांची आवश्यकता असते.
महत्त्वाचं म्हणजे, कार्डिअॅक अरेस्ट (Cardiac Arrest Symptom) होण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीला लक्षणं जाणवतातच असं नाही. काही लोक कोणतीही स्पष्ट पूर्वसूचना न देता अचानक बेशुद्ध पडू शकतात. मात्र, काही व्यक्तींमध्ये त्याआधी काही शारीरिक बदल जाणवू शकतात.
कार्डिअॅक अरेस्टपूर्वी (Cardiac Arrest) कोणती लक्षणं जाणवू शकतात?
– छातीत दुखणे, दडपण किंवा अस्वस्थता
– अचानक श्वास घेण्यास त्रास होणे
– हृदयाची धडधड वाढणे किंवा अनियमित वाटणे
– अचानक चक्कर येणे
– अशक्तपणा किंवा बेशुद्ध पडल्यासारखं वाटणे
– नेहमीपेक्षा जास्त आणि अचानक थकवा जाणवणे
– कारण नसताना घाम फुटणे
– मळमळ किंवा बेचैनी जाणवणे
– छातीवर जडपणा किंवा दाब जाणवणे
तसेच ही लक्षणं प्रत्येक वेळी कार्डिअॅक अरेस्टचीच चिन्हं ( heart attack vs cardiac arrest ) असतील असं नाही. अॅसिडिटी, चिंता, इतर हृदयविकार किंवा अनेक वैद्यकीय कारणांमुळेही अशी लक्षणं होऊ शकतात. मात्र, लक्षणं अचानक, तीव्र किंवा असामान्य स्वरूपाची असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
अचानक कार्डिअॅक अरेस्ट आल्यास काय करावे?
जर तुम्हाला अचानक तीव्र छातीत दुखत असेल, श्वास घेण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होत असेल, चक्कर येत असेल किंवा बेशुद्ध पडण्यासारखं वाटत असेल, तर मदत मागण्यात अजिबात वेळ घालवू नका.
शक्य असल्यास:
तातडीच्या वैद्यकीय सेवांशी संपर्क साधा.
जवळच्या कुटुंबीयांना किंवा शेजाऱ्यांना कळवा.
शक्य असल्यास घराचा दरवाजा उघडा किंवा अनलॉक ठेवा.
स्वतः वाहन चालवून रुग्णालयात जाण्याचा धोका घेऊ नका.
कार्डिअॅक अरेस्टमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचं का?
कार्डिअॅक अरेस्ट झाल्यानंतर व्यक्ती सहसा लवकर रिस्पॉन्स देत नाहीत आणि नॉर्मल श्वास घेत नाही. हृदय रक्त पंप करत नसल्याने मेंदू आणि इतर अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो.
अशा परिस्थितीत तातडीने आपत्कालीन मदत बोलावणे, CPR सुरू करणे आणि उपलब्ध असल्यास AED वापरणे महत्त्वाचे ठरू शकते. उपचार सुरू होण्यास जितका विलंब होतो, तितका गंभीर परिणाम होण्याचा धोका वाढतो.
Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी पाहा आजचे दर; महाराष्ट्रातील शहरनिहाय भाव
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
छातीत दुखणे किंवा धाप लागणे म्हणजे नेहमीच कार्डिअॅक अरेस्ट होणार आहे, असं नाही. मात्र, नवीन, अचानक किंवा तीव्र स्वरूपाची लक्षणं जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही.
विशेषतः हृदयरोग, मधुमेह किंवा कुटुंबात कमी वयात हृदयविकाराचा इतिहास असल्यास नियमित वैद्यकीय तपासणी आणि नवीन लक्षणांबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.







