Nalasopara Crime Case : मुंबईला लागून असलेल्या नालासोपाऱ्यात वासनेचा आणि ब्लॅकमेलिंगचा एक भयानक कट उघडकीस आला आहे, जिममध्ये वाढवलेली ओळख, नवरात्रीच्या गरब्यात मिळवलेलं टार्गेट आणि त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून तब्बल ७० ते ८० हिंदू तरुणींचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरिफ शेख नावाच्या २३ वर्षीय तरुणाच्या मोबाईल मध्ये १५० हून जास्त अश्लील व्हिडीओ सापडले असून ते परदेशी पॉर्न साईट्सवर विकल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण काळ्या कृत्यात नराधम आरिफला साथ देणारी दुसरी तिसरी कोणी नसून, त्याची स्वतःची सख्खी आई होती, असा आरोप आहे…..
आरोपी आरिफ आयुब शेख ( Aarif Sheikh ) हा जिममध्ये येणाऱ्या आणि परिसरात राहणाऱ्या हिंदू मुलींना जाळ्यात ओढायचा. पीडित तरुणीने दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार, आरिफ शेख हा अल्पवयीन हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, पैसे मागायचा आणि नाही दिले तर त्यांच्या एक ग्रुप होता, मुलांना मुलीचे फोटो पाठवून सामुहिक अत्याचार करायला सांगायचा, त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करून परदेशी साईटला विकायचा, पीडितेच्या दाव्यानुसार, परिसरातल्या तब्बल ७० ते ८० हिंदू मुली आरिफच्या या लव्ह ट्रॅपच्या बळी ठरल्या आहेत.
आरोपीच्या आई आणि नातेवाईकावरील आरोप काय?
आरिफ मुलींचे व्हिडिओ बनवतो, त्यांना ब्लॅकमेल करतो, हे त्याच्या आईला पूर्ण ठाऊक होते. या संपूर्ण रॅकेटमध्ये त्याची आई आणि त्याचा नातेवाईक साहिल खान हे दोघेही बरोबरीने सामील आहेत. त्यांनी अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप प्दितेकडून करण्यात आला आहे….
ज्या घरात मुलाच्या गुन्ह्यावर पांघरूण घातलं जातं आणि आईच दुसऱ्या मुलीच्या असहायतेचा फायदा घेण्यास आपल्या मुलाला प्रोत्साहन देते, तिथे गुन्हेगारीची पातळी किती खाली घसरली असेल, याचा विचारच केलेला बरा. नालासोपारा पोलिसांनी आता आरिफसोबत त्याची आई रुक्शाना आणि साहिल खान यांच्याविरोधातही गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. जेव्हा स्थानिक नागरिकांनी आणि हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा माग काढत आरोपीला गाठले आणि त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला, त्याच्या मोबाईलमध्ये १५० पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ आढळून आले आहेत…
हेही वाचा : साडेपाच वर्षांचं प्रेम, लग्नाची तारीख ठरली अन् शेवटची भेट ठरली जीवघेणी!
व्हिडिओ ऑनलाइन अपलोड केल्याच्या संशयाची चौकशी ( Sexual Exploitation Case )
प्राथमिक तपासात आणि संशयानुसार, आरिफ हे व्हिडिओ परदेशी पॉर्नोग्राफिक वेबसाईटवर अपलोड करायचा. परदेशी सर्व्हरच्या माध्यमातून हे व्हिडिओ विकून तो डॉलरमध्ये आणि मोठ्या प्रमाणावर पैशांची कमाई करत असल्याचा संशय आहे. म्हणजेच, हा साधा बलात्काराचा गुन्हा नसून, हे एक आंतरराष्ट्रीय डिजिटल सेक्स आणि मॉनिटायझेशन रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे, ज्याची व्याप्ती खूप मोठी आहे. या प्रकरणाला सर्वात मोठा, वादग्रस्त आणि संतापजनक वळण मिळालं आहे ते आरिफच्या मोबाईलमधून हस्तगत करण्यात आलेल्या एका
WhatsApp मेसेजमुळे आरिफने आपल्या एका मित्राला पाठवलेला मेसेज आता समोर आला आहे. या मेसेजमध्ये आरिफने काय लिहिले आहे पहा (मेसेज हायलाईट करा)
हा मेसेज समोर आल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा मेसेज थेट यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय, आरोपी आरिफला स्थानिक पोलीस ठाण्यातील किंवा विभागातील कोणत्या काळ्या मेंढीचे अभय होते? आरिफच्या या एका मेसेजने आता तपासाची संपूर्ण दिशा बदलून टाकली आहे. जर या मेसेजमधील तथ्य खरे निघाले, तर कायद्याचे रक्षकच भक्षकांच्या भूमिकेत असल्याचे सिद्ध होईल आणि स्थानिक पोलिसांना आपल्याच विभागातील संशयितांची चौकशी करावी लागेल.
कथित सहभागाबाबत तपास सुरू ( Nalasopara Crime Case )
१२ ऑक्टोबर रोजी पीडित तरुणीने दाखवलेल्या प्रचंड धैर्यामुळे नालासोपारा पोलिसांनी मुख्य आरोपी आरिफ आयुब शेख याला बेड्या ठोकल्या आहेत. परंतु, प्रकरणाची संवेदनशीलता आणि दोन वेगवेगळ्या धर्मांमधील तणाव पाहता पोलिसांनी सध्यातरी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देणं टाळले आहे.
नालासोपाऱ्यातील हे सेक्स स्कँडल केवळ एका विकृत तरुणाचे कृत्य नाही, तर आपल्याच आसपास वावरणाऱ्या एका हिंस्त्र लांडग्याची भयानक कहाणी आहे. जिम, गरबा आणि सोशल मीडियाच्या युगात आपल्या बहिणी, आपल्या मुली किती सुरक्षित आहेत? हा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. आरिफच्या मोबाईलमधील १५० व्हिडिओंमध्ये अजून किती तरुणींचे चेहरे दडलेत? आणि आंतरराष्ट्रीय पॉर्न साईट्सवर महाराष्ट्रातील लेकींचा सौदा करणाऱ्या या टोळीला न्यायालय फासावर लटकवणार का? हे पाहणं महत्वाच ठरेल….









