• Home
  • ताज्या बातम्या
  • पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; रोहित पवारांनी सांगितलं कारण!
राजकारण

पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; रोहित पवारांनी सांगितलं कारण!

Pawar Family Diwali 2026
12

Pawar Family Diwali 2026 : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय… राज्यभरात दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे… मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या कुटुंबांपैकी एक असलेल्या पवार कुटुंबाने यंदा दिवाळी साजरी न करण्याचा मोठा निर्णय घेतलाय… याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे… पवार कुटुंबीय यंदा बारामतीत पारंपरिक दिवाळी पाडव्याचा उत्सव साजरा करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय…

या निर्णयामागे दोन प्रमुख कारणं आहेत… पहिलं म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर ओढवलेलं भीषण दुष्काळाचं संकट आणि दुसरं म्हणजे अजित पवार यांचं दुर्दैवी निधन… अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पवार कुटुंबासाठी आनंदाची नसून दुःखाची ठरणार आहे… याशिवाय राज्यातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात असताना आपण दिवाळीचा उत्सव कसा साजरा करायचा, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे…

पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही? ( Pawar Family Diwali 2026 )

महाराष्ट्रात यंदा १९७२ सारखी भीषण दुष्काळ पाहायला मिळत आहे… पिकांना पावासाची गरज होती आणि अचानक पावसाने पाठ फिरवली…पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिकं नष्ट झाली… मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर पाहायला मिळत आहे… पिकांसाठी घेतलेलं कर्ज, शेतीवर केलेला खर्च आणि हाती न आलेलं उत्पन्न यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत…दुष्काळ पडताच मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे… त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांसाठी यंदाची दिवाळी आनंदाची ठरणार नाही.

दिवाळीत नवीन कपडे घ्यावेत, फटाके फोडावेत, गोडधोड खावं, अशी प्रत्येक लहान मुलाची इच्छा असते… शेतकऱ्यांची मुलंही आपल्या वडिलांकडे नवीन कपडे आणि फटाक्यांसाठी हट्ट करतील… मात्र पिकांचं नुकसान झालेल्या आणि खिशात पैसे नसलेल्या शेतकरी वडिलांसमोर मुलांच्या या छोट्या इच्छा पूर्ण करण्याचीही शक्ती उरलेली नाही… तर ज्या कुटुंबांनी आत्महत्येमुळे आपला कर्ता माणूस गमावला आहे, त्या कुटुंबांसाठी ही दिवाळी दुःखाची ठरणार आहे… अशा परिस्थितीत पवार कुटुंबाने दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं…

हेही वाचा : Tesla Flying Car : एलॉन मस्कची उडणारी कार भारतात चालेल का? ट्रॅफिकमध्ये काय होणार?

महाराष्ट्रातील दुष्काळामुळे शेतकरी संकटात ( Maharashtra Drought )

दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था गंभीर असतानाही राज्य सरकारकडून पुरेशी मदत मिळत नसल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय…. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय…आज महागाई एवढी वाढली आहे की 5 हजारामध्ये 15 दिवस देखील घर चालणार नाही….

या 5 हजारात शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासाठी काय काय खरेदी करावं…जर शेतकऱ्यांच्या लहान मुलांनी नवीन कपड्यासाठी हट्ट केला, तर ते कपडेच 5 हजारात मिळतील…मग घरात दिवाळी साजरा करण्यासाठी किराणा कुठून भरायचा…इतर गोष्टी कशा खरेदी करायच्या, असा प्रश्न आता निर्माण झालाय… शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत देण्यात यावी आणि त्यापैकी ३० ते ३५ हजार रुपये तातडीची अग्रीम मदत म्हणून द्यावेत, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे..शेतमजुरांनाही आर्थिक आधार देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे…

शेतमजुरांना ₹२५ हजार देण्याची मागणी

जर सरकारला यंदाची दिवाळी साजरी करायची असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना भरभरून मदत करावी…शेतमजुरांच्या प्रत्येक कुटुंबाला २५ हजार रुपयांची मदत देण्यात यावी… त्याचबरोबर सरकारने यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी रोहित पवारांनी केली….

अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबाने यंदा दिवाळी पाडव्याचा पारंपरिक उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे… बारामतीतील पवार कुटुंबाचा दिवाळी पाडवा हा दरवर्षी राजकीय कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी महत्त्वाचा कार्यक्रम असतो…पण अजित दादांचं मुंबईहून बारामतीला येताना विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला…अजित दादांच्या जाण्याने पवार कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय…यामुळेही पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही… आता दिवाळीपूर्वी सरकार शेतकऱ्यांच्या मदतीत वाढ करणार का, हेक्टरी एक लाख रुपयांची मदत आणि कर्जमाफीच्या मागण्यांवर काय निर्णय घेणार, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics, UI & UX.Education : Bachelor Of Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts