Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील आगामी परिस्थितीबाबत मोठं विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुंबई प्रेस क्लबमधील कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी निवडणुका, लोकशाही आणि केंद्र सरकारच्या कारभारावरही भाष्य केलं.
Raj Thackeray Statement: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील साध्यची परिस्थिती आणि आगामी राजकीय घडामोडींवर भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. मुंबई प्रेस क्लबमधील (Mumbai Press Club) एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना ( Raj Thackeray Press ) त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, लोकशाही आणि केंद्र सरकारच्या कारभारासह विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.
हेही वाचा: टीम इंडियाचा वर्ल्ड कप रोडमॅप ठरला! पहिली लढत वेस्ट इंडिजशी, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
निवडणूक प्रक्रियेवर राज ठाकरेंची उपस्थित केले प्रश्न
मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित फोटो प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी पत्रकांराशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इलेकट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणूका घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी मतदान पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले.
देशातील परिस्थितीबाबत व्यक्त केली चिंता
देशातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर बोलताना राज ठाकरे यांनी आगामी काही महिन्यांमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. तसेच देशातील लोकशाही व्यवस्था, नागरिकांचे अधिकार आणि सरकारच्या निर्णयांबाबतही त्यांनी आपली मते मांडली.
हेही वाचा: दिवाळीच्या तारखांमध्ये खास योग! लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त ते भाऊबीज, जाणून घ्या संपूर्ण सणाचं वेळापत्रक
सरकारच्या कारभारावर टीका
यावेळी राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत विविध राजकीय आणि सामाजिक विषयांचा उल्लेख केला. विद्यार्थ्यांची आंदोलने, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, न्यायव्यवस्था आणि माध्यमांशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. देशातील जनतेच्या असंतोषाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सूचित केले.
आगामी काळात काय घडणार?
राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळातील राजकीय घडामोडींबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, देशात पुढील काही महिन्यांत नेमकी कोणती घटना घडेल, याबाबत त्यांनी केलेल्या विधानाला निश्चित निष्कर्ष मानता येणार नाही. त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ आणि त्यामागील राजकीय भूमिका समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.









