• Home
  • ताज्या बातम्या
  • Rehan Vadra Photo Exhibition: प्रियंका गांधींच्या मुलाचे ७४ फोटो हटवले; प्रदर्शनाआधी नेमकं काय घडलं?
राजकारण

Rehan Vadra Photo Exhibition: प्रियंका गांधींच्या मुलाचे ७४ फोटो हटवले; प्रदर्शनाआधी नेमकं काय घडलं?

Rehan Vadra Photo Exhibition
14

Rehan Vadra Photo Exhibition: देशात सध्या प्रियंका गांधी यांचा मुलगा (Priyanka Gandhi Son) रेहानने काढलेल्या फोटोवरून चांगलाच वाद निर्माण झालाय…रेहानचे फोटो प्रदर्शनातून तब्बल 74 फोटो हटवण्यास सांगण्यात आले…या फोटोमध्ये देशाच्या तिरंग्याचे फोटोही होते…प्रदर्शन सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी प्रशासनाने फोटो हवटण्याचा निर्णय घेतलेल्याने हा मोठा वाद निर्माण झालाय…प्रियांका गांधी यांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला असून, तरुणांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केलाय… मात्र, हे फोटो नेमके कोणत्या आंदोलनाचे होते? प्रशासनाला त्यावर आक्षेप का होता? आणि या प्रकरणात भाजपची भूमिका काय आहे?

रेहान वाड्राचे ७४ फोटो प्रदर्शनातून हटवले (Rehan Vadra Photo Exhibition)

देशात सध्या सीजेपीच्या आंदोलनाने वातावरण चांगलंच तापलेलं आहे…दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे…तसंच काही गुंडांनी देखील आंदोलकांना तरूणींना बेदम मारहाण केली…याचा पडसाद देशभरासह विदेशात पाहायला मिळाले…आता या आंदोलनासंबंधीत काही फोटो रेहान वाड्राने (Rehan Vadra) काढले…दिल्लीतील बिकानेर हाऊस या सांस्कृतिक केंद्रात 21 ऑक्टोबर रोजी रेहानच्या No Idea Is Final या फोटो प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं…त्याच्या प्रदर्शनात एकूण १०५ फोटोंचा समावेश करण्याचं नियोजन होतं… त्यामध्ये वन्यजीवन, अमूर्त कला, रस्त्यावरील दृश्यं आणि गेल्या सहा महिन्यांत दिल्लीत झालेल्या तरुणांच्या आंदोलनांचे फोटो होते… मात्र, प्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वीच बिकानेर हाऊस प्रशासनाने त्यातील बहुतांश फोटोंवर आक्षेप घेतला..

रेहानच्या म्हणण्यानुसार, प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास प्रशासनाकडून पहिल्यांदा आक्षेप नोंदवण्यात आला… त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता १०५ पैकी ७४ फोटो हटवण्याचे सांगण्यात आले….हे फोटो हटवले नाहीत, तर संपूर्ण प्रदर्शन रद्द करण्यात येईल, असं सांगण्यात आल्याचा रेहानचा दावा आहे… त्यामुळे प्रदर्शन सुरू होण्यापूर्वी आयोजकांना अनेक फोटो काढावे लागले… संध्याकाळपर्यंत केवळ ३५ कलाकृती प्रदर्शनात शिल्लक होत्या… काही फोटो काढल्यानंतर त्यांच्या जागी रिकाम्या फ्रेम ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, त्या फ्रेमवरही प्रशासनाने आक्षेप घेतल्याचं रेहानने सांगितलं…

हेही वाचा : IndiaAI Fellowship 2026: विद्यार्थ्यांना ₹२ लाखांपर्यंत आर्थिक मदत; अर्जाची अंतिम तारीख काय?

तिरंग्याच्या फोटोंवरूनही वाद; प्रशासनाची भूमिका काय?

या संपूर्ण प्रकरणातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे देशाच्या तिरंग्याचे फोटो… रेहानने दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाने भारतीय राष्ट्रध्वज असलेले दोन फोटो हटवण्यास सांगितले… मात्र, तिरंग्याचा फोटो स्वतःहून हटवण्यास त्याने नकार दिला… आपण प्रदर्शनस्थळावरून बाहेर गेल्यानंतर प्रशासनाने एक फोटो स्वतः काढून टाकल्याचा आरोपही त्याने केला… या घटनेचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचं रेहानने सांगितलं ..

पण प्रशासनाला या फोटोंवर आक्षेप नेमका का होता? यावर बिकानेर हाऊस मॅनेजमेंट सोसायटीने २२ ऑक्टोबर रोजी आपली भूमिका स्पष्ट केली… बिकानेर हाऊस ही कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणारी सार्वजनिक संस्था असून, येथे आयोजित प्रदर्शनांनी संस्थेच्या धोरणांचं पालन करणं आवश्यक आहे… रेहानच्या प्रदर्शनातील काही फोटो संस्थेच्या धोरणाशी सुसंगत नसल्यामुळे ती हटवण्याची विनंती करण्यात आली, असं त्यांनी म्हटलं…पण कोणत्या नियमांचे उल्लंघन झालं…कुणी फोटो हटण्यास सांगितले, याबाबत काही स्पष्टीकरण दिले नाही….

आता या प्रकरणी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे..एका कलाकराचे फोटो तुम्ही कसं हटवू शकता…प्रियंका गांधींनी नाव न घेता मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे…यानंतर हा वाद आता चांगलाच पेटताना दिसत आहे…या प्रकरणात राजकारण सुरू असून भाजपकडून दबाव निर्माण केल्या जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे….या वादानंतर रेहानने संपूर्ण छायाचित्रसंग्रह दुसऱ्या ठिकाणी प्रदर्शित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts