Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • Sanjay Raut : अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडायचे होते; २७ बैठकांबाबत मोठा दावा
राजकारण

Sanjay Raut : अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडायचे होते; २७ बैठकांबाबत मोठा दावा

Sanjay Raut
9
Sanjay Raut : अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडायचे होते, दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणासाठी २७ बैठका झाल्या, असा संजय राऊतांचा दावा. नेमकं काय म्हणाले राऊत?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडायचे होते. महायुतीमध्ये राहून काहीच उपयोग नाही, याची जाणीव त्यांना झाली होती, असे राऊत म्हणाले. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्यासंदर्भात अजित पवारांच्या उपस्थितीत २७ बैठका झाल्याचा दावाही त्यांनी केला. अमित शहा यांनी दोन्ही गटांना आपल्या प्रभावाखाली घेतल्याचा आरोप करत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. (NCP Party)

अजित पवार हे ईडीच्या भीतीपोटी भाजपसोबत गेले होते. मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाला होता, असा आरोप संजय राऊत यांनी केला. महायुतीमध्ये राहून काहीच साध्य होणार नाही, हे अजित पवारांना समजले होते. त्यामुळे त्यांची मानसिकता महायुतीतून बाहेर पडण्याची होती, असा दावाही त्यांनी केला. (ED investigation)

विलीनीकरणासाठी २७ बैठका झाल्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत अजित पवारांच्या उपस्थितीत तब्बल २७ बैठका झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. मात्र, आता विलीनीकरणाचा प्रश्न संपला असून या विषयावर पडदा पडल्याचे त्यांनी म्हटले. अमित शहा यांनी दोन्ही गटांना आपल्या प्रभावाखाली घेतल्याचा आरोपही राऊत यांनी केला. शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार नाही, याची आपल्याला खात्री असल्याचे संजय राऊत म्हणाले. शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार भाजपचे नाहीत. त्यामुळे शरद पवार यांची राजकीय भूमिका आणि विचारधारा भाजपपेक्षा वेगळी असल्याचे राऊत यांनी अधोरेखित केले.(Sanjay Raut Statement)

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना आवाज उठवण्याचे आवाहन

या राजकीय घडामोडींवर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी आवाज उठवायला हवा, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत त्यांनी ‘देवेंद्रभाई’, तसेच  ‘सुनेत्राबेन, एकनाथभाई’ असा उल्लेख संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले या दावे. (Amit Shah)

हेही वाचा : NCP Merger : राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार की नाही? शरद पवारांच्या भेटीगाठी आणि फडणवीसांच्या विधानाने चर्चेला वेग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts