Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का, १०० पदाधिकारी अन् जिल्हाप्रमुखाचा राजीनामा
ताज्या बातम्या

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का, १०० पदाधिकारी अन् जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

Resignations of Thackeray group officials

Resignations of Thackeray group officials : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला सोलापूरात मोठा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुका काही दिवसांवर आहे. असा परिस्थितीत ठाकरे गटातील तब्बल १०० पदाधिकारी आणि जिल्हाप्रमुखाने राजीनामा दिलाय. त्यामुळे हा ठाकरेंच्या शिवसेनाला मोठा धक्का मानला जात आहे. सोलापुर जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी अंतर्गत वादामुले आपण हा राजीनामा देत असल्याचे पत्रात नमूद केलं आहे.

सध्या महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मात्र, ऐन निडणुकीच्या तोंडावर हा ठाकरेंच्या शिवसेना मोठा धक्का मानला जात आहे. राज्यात २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणूक सर्वच पक्षाने प्रतिष्ठेची केलीय. उद्या उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस असून अद्याप जागावाटपांचा तिडा सुटलेला नाही. त्यामुळे अनेक पक्षातील पदाधिकाऱ्याचे नाराजीनाट्य समोर येत आहे. त्यातच ठाकरे गटाच्या १०० पदाधिकारी आणि जिल्हाप्रमुखाने दिलेल्या राजीनाम्याने शिवसेनेची ताकद कमी झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – शिंदे गटातील अंतर्गत वाद उफाळला! कल्याणमध्ये पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू

अजय दासरींच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामे

जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एकीकडे दुपारीच १०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले असताना आता थेट जिल्हाप्रमुखांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या नेतृत्वावर सर्वांकडून आरोप प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या पक्षातील बंडाळाची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालिका निवडणुकीची जबाबदारी दासरी यांच्यावरच

सोलापुरात जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्याविरोधात ठाकरे गटात मोठी खदखद पाहायला मिळत आहे. पालिका निवडणुकीची जबाबदारी ठाकरे यांनी दासरी यांच्यावरच सोपवलेली आहे. परंतु त्यांच्या कारभारावर इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते नाराज आहे. याच कारणामुळे सोलापुरातील १०० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शंभरहून अधिक पदाधिकारी तसेच जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ठाकरे गट हा फटका कसा भरुन काढणार तसेच सोलापुरात निवडणूक जिंकण्यासाठी नेमकं काय करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts