• Home
  • शैक्षणिक बातम्या
  • बांग्लादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांनी घेतला अखेरचा श्वास
Top News

बांग्लादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांनी घेतला अखेरचा श्वास

Begum Khaleda Zia former Prime Minister of Bangladesh

Begum Khaleda Zia death : बांग्लादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान तथा बीएनपी अध्यक्ष खालिदा झिया यांचे नुकतेच निधन झाले आहे. यामुळे बांगलादेश मध्ये शोककळा पसरली आहे. खालिदा झिया या फॅशन आणि स्टाईलसाठी सुद्धा प्रसिद्ध होत्या. त्यांचे कपडे कधीच ग्लॅमर किंवा शो साठी नाही तर व्यक्तिमत्व, राजकीय भूमिका आणि मानसिक शक्ती प्रतिबिंबित करण्यासाठी होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

काय होती मोदींची पोस्ट

बांग्लादेशातील माजी पंतप्रधा बेगम खालिदा झिया यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट करत तीव्र दुःख व्यक्त केले असून श्रद्धांजली वाहिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. लिदा झिया यांच्या निधनाची बातमी ऐकून पंतप्रधान मोदी अत्यंत दुखी झाले आहे. कठीण काळात त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवाने द्यावी अशी प्रार्थना मोदींनी केली.

बांगलादेश येथील ढाका येथे माजी पंतप्रधान आणि BNP अध्यक्षा बेगम खलिदा झिया यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि बांग्लादेशच्या सर्व जनतेला दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. या दुःखद प्रसंगी देव त्यांना बळ देवो असं पंतप्रधान मोदी यांनी पोस्ट मध्ये म्हंटले आहे. नॅशनॅलिस्ट पार्टीकडून आलेल्या एका निवेदनात म्हंटले आहे कि, ‘फ्रज नमाजानंतर पहाटे 6 वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या आत्म्याला शांति लाभो. यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी.’

हे ही वाचा : शिंदे गटातील अंतर्गत वाद उफाळला! कल्याणमध्ये पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू

दीर्घकाळापासून अनेक आजारांनी त्रस्त

बेगम खालिदा यांचे मंगळवारी म्हणजे आज पहाटेच्या सुमारास एव्हरकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. खालिदा झिया यांना 23 नोव्हेंबर रोजी ढाक्यातील एव्हरकेअर हॉस्पिटल मध्ये फुफुसाच्या संसर्गामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. खालिदा झिया हे दीर्घकाळापासून हृदयरोग, मधुमेह, संधिवात, यकूत सिरॉसिस आणि मूत्रपिंडाच्या आजारांनी त्रस्त होत्या. त्यांच्या निधनानंतर रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts