• Home
  • राजकारण
  • छत्रपती संभाजीनगरात महायुती फिस्कटली; भाजप शिंदेसेना स्वतंत्र लढणार
Top News

छत्रपती संभाजीनगरात महायुती फिस्कटली; भाजप शिंदेसेना स्वतंत्र लढणार

BJP and Shinde Sena leaders amid reports of Mahayuti collapse in Chhatrapati Sambhajinagar

Mahayuti collapse Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर मध्ये अखेर महायुती फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या बैठकांना काही यश आल्याचे दिसून येत नाही. आता छत्रपती संभाजीनगर मधून भाजप आणि शिवसेना शिंदे गट स्वतंत्र पद्धतीने महापालिका निवडणूक लढणार आहे.

एका निर्णयायाने संपूर्ण घोळ

छत्रपती संभाजीनगर मध्ये तब्बल 10 बैठका झाल्या. त्यापैकी एका बैठकीमध्ये महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. महायुती झाल्याचेच ठरलेले असताना काल पासून वेगळ्याच दिशेने वारे वाहू लागले. आणि शिवसेना शिंदे गट भाजप पक्षावर नाराज असल्याचे निदर्शनासले. एका निर्णयायाने संपूर्ण घोळ झाला आणि हि युती फिस्कटली अशी माहिती समोर आली आहे. आता याचा फायदा उद्धव ठाकरे याना होणार असल्याच्या चर्चा आता रंगल्या आहेत.

हे ही वाचा : शिंदे गटातील अंतर्गत वाद उफाळला! कल्याणमध्ये पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू

शिवसेनेला भाजपने फक्त 37 जागा देऊ केल्या

शहरातील युती फिस्कटल्यानंतर शिवसेना संजय शिरसाठ यांच्या बंगल्यावर पोहोचली. आता इच्छुकांची यादी केली जात असून अंतर्गत नाराजी आणि जागा वाटपावरून झालेला वाद विकोपाला पोहोचल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत. 115 जागा असणारी महापालिके निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार असल्याच्या चर्चा होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेला भाजपने फक्त 37 जागा देऊ केल्या. त्यामुळे शिवसेना शिंदे गट नाराज झाला.

राजेंद्र जंजाळ यांनी थेट निवडणुकीतूनच माघार

भाजप आणि शिंदेसेनेत युती करण्यासंदर्भात सात ते आठ बैठका झाल्या, मात्र काही जागांबाबत वाद असल्याने दोन्ही पक्षांच्या युतीची अद्याप घोषणा झाली नाही. 39 शिवसेना आणि 48 भाजप असे ठरल्याची माहिती मिळत आहे. भाजप कमी जागा देत असल्याच्या कारणावरून शिंदेसेनेत अंतर्गत भडका उडाला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट निवडणुकीतूनच माघार घेतली, महाविकास आघाडीतही ते चित्र आहे. अजून पर्यंत कोण किती जागा लढवणार यावर एकमत झाले नाही मात्र राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली, तर काँग्रेस सोबत बोलणं चालू असल्याचं शिवसेना ठाकरे गट सांगत आहेत त्यामुळे शेवटच्या क्षणी एबी फॉर्म दिले जातील आणि त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts