ताज्या बातम्या

हतनुर धरणाचे 24 दरवाजे उघडले

24 gates of Hatnur dam opened
301

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 1 लाख 25 हजार क्युसेक इतका प्रचंड पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून स्थानिक नागरिकांना देखील जिल्हा प्रशासनाने अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विदर्भ, मध्यप्रदेशसह जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे 24 दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग असून धरणात पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts