Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • १० बाय १० च्या खोलीत ५० मतदार, याद्यांमध्ये घोळ; आदित्य ठाकरेंचा आयोगावर गंभीर आरोप
Top News

१० बाय १० च्या खोलीत ५० मतदार, याद्यांमध्ये घोळ; आदित्य ठाकरेंचा आयोगावर गंभीर आरोप

Aaditya Thackeray Prees Conference

Aaditya Thackeray : राज्य निवडणूक आयोगाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड गोंधळ आहे. हा गोंधळ आहे की, जाणून बुजून केलेला गुन्हा, मला विचाराल तर हा स्पष्टपणे देशद्रोहाचा गुन्हा आहे, असं आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आज आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीतील गोंधळावरून राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन काही मागण्या केल्या आहेत. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. तसचं मतदार यांद्यामध्ये बदल न झाल्या रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.

मागील तीन वर्षापासून राज्यातील महानगरपालिका निवडणुका आज होतील उद्या होतील याची आम्ही सगळे वाट बघत आहोत. कारण एकंदरीत आपण पाहिलं तर असंच वातावरण आहे की, हे सरकार जे निवडणूक आयोगाने बसवलेलं सरकार आहे. जे मतचोरी करून आलेलं सरकार आहे. ते सरकार प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार करत आहे. मग ते जमिनीचा घोटाळा असलं, कोण मंत्री पैशाची पिशवी बाजूला घेऊन बसत असेल, कोणाचा डाॅन्स बार असेल, हे सर्व घोटाळा टिव्ही वाहिन्यांच्या माध्यमांतून लोकांसमोर जात आहेत. त्यामुळे जनतेला याचा राग आलेला आहे. ग्रामीण भागात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पण मदत ही कुठेही पोहोचलेली नाही. आणि आम्ही आमचा निकाल या सरकारवर कधी देऊ लोक वाटचं पाहात आहेत, असं माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – “रात्र वैऱ्याची आहे… मराठी माणसांसाठी ही निवडणूक शेवटची..”; राज ठाकरे असे का म्हणाले?

राज्य निवडणूक आयोगाने ज्यावेळी निवडणूक जाहीर केली, त्यावेळी आम्ही काही सूचना व आक्षेप घेतले होते. तो टप्पा पार झाल्यानंतर जी प्रारूप मतदार यादी ७ नोव्हेंबरला येणार होती, तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की, ती ७ नाही तर, १४ नोव्हेंबर रोजी येणार आहे. त्यानंतर १४ नाही तर २० तारखेला येणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं. २० तारखेलाही सगळ्यांना माहित आहे की, जी यादी आली, ती संध्याकाळपर्यंत डाउनलोड होत नव्हती. कदाचित भाजप सोडून सगळ्याच पक्षांनी यादी वाचन सुरू केली आहे. त्याच रात्री कळायला लागलं. यादीत प्रचंड घोळ झालेला आहे.

अनेक प्रभागांमध्ये काही मतदार याद्या अशा होत्या, ज्या प्रारूप मतदार यादीत दाखवल्या आहेत, मात्र त्यात बिल्डिंगच्या-बिल्डिंग दुसऱ्या यादीत टाकल्या आहेत. यात बरोबर काही ठराविक लोक, ज्यात जात, धर्म आणि भाषा असेल. अशी लोक, अशा याद्या या दुसऱ्या प्रभागामध्ये टाकल्या आहेत. आताही आम्ही निवडणूक आयोगात हेच सांगून आलो की, सगळ्या प्रभागात या याद्या हललेल्या नाहीत. याचे आमच्याकडे पुरावे आहेत. काही सत्ताधारी पक्षाचे प्रभाग आहेत, ते तसेच्या तसे आहेत. मग बरोबर विरोधी पक्षाच्या प्रभागांना लक्ष्य करून या याद्या हलल्या कशा? कोणी हलवल्या?”, अशा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

महानगरपालिकेच्या कार्यालयातून आम्ही २०३ प्रभागांची यादी विकत घेतली आहे. त्यामध्ये प्रकाशित तारीख १४ नोव्हेंबर आहे. मग ही तारीख १४ नोव्हेंबर असताना तुम्ही आम्हाला २० नोव्हेंबरला यादी कशी दिली? मग हा गुन्हा आहे की, गोंधळ आहे? सातत्याने आम्ही हेच सांगत आहोत की, जर तुम्ही हे बदललं नाही, म्हणजे तुमच्या मनामध्ये पपा आहे. तुमच्या ह्रदयात देशद्रोह आहे आणि तुमच्यावर देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये बदल केले नाही तर, अर्थात विरोधी पक्ष रस्त्यावर उरणारच. पण कोर्टातही आम्ही याच मागणी घेऊन जाऊ की, यांचं निलंबन झालं पाहिजे आणि नुसतं निलंबन नाही तर, देशद्रोहाचा कायदा झाला पाहिजे, असे आदित्य ठाकरे यानी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts