• Home
  • देश
  • होर्मुज खाडीत युद्धाचा भडका! अमेरिकेने इराणवर केला सर्वात मोठा बॉम्ब हल्ला, तणाव शिगेला
Top News

होर्मुज खाडीत युद्धाचा भडका! अमेरिकेने इराणवर केला सर्वात मोठा बॉम्ब हल्ला, तणाव शिगेला

us iran

America Attack On Iran | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या तिन्ही देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. युद्धाच्या 19 व्या दिवशी देखील मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे. इराण अमेरिकेच्या दुतावासाला टार्गेट करताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच इराणने बगदादमध्ये असलेल्या अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला केला, ज्यात दूतावासाच्या एका इमारतीला भीषण आग लागली होती. इराणच्या या हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या अमेरिकेने आता त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेने थेट आता होर्मुझ सामुद्रधुनीला (Hormuz Strait) टार्गेट केले आहे.

हेही वाचा – भारताला मोठा दिलासा! 47 हजार टन एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज गुजरातच्या वडीनार बंदरात दाखल

अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा हल्ला

अमेरिकेच्या लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या इराणवर तब्बल 5,000 वजनांचे बॉम्ब टाकत हल्ला केला आहे. अमेरिकेने इराणवर केलेला हा हल्ला सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.

या हल्ल्याबाबत अमेरिकेच्या सेंटकॉमने ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. “अमेरिकेन लष्कराने काही तासांपूर्वीच होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या इराणच्या किनारपट्टीवरील इराणी क्षेपणास्त्र तळांवर 5,000 वजनाची खोलवर भेदणारी शस्त्रे यशस्वीरित्या तैनात केली आहेत. या तळांवर असलेल्या जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रांमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आतंरराष्ट्रीय जहाज वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे”, अशी माहिती अमेरिकेच्या सेंटकॉमने दिली.

अमेरिकेच्या सैन्याने इराणवर टाकले 5,000 वजनाचे मोठे बॉम्ब

अमेरिकेच्या सैन्याने इराणी क्षेपणास्त्र असलेल्या ठिकाणांवर 5,000 वजनाचे मोठे बॉम्ब टाकत हल्ले केले. तसेच अमेरिकेकडून इराणच्या क्षेपणास्त्राच्या साठ्यावर अंदाजे 23 क्विंटल बॉम्बने हल्ला करण्यात आला. इराणच्या किनारपट्टीवर असलेल्या तटबंदीयुक्त क्षेपणास्त्र साठवणूक आणि प्रक्षेपण स्थळांवर अमेरिकेने बॉम्ब टाकले. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे.

इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे दोन अधिकारी ठार?

दुसरीकडे इस्त्रायलने इराणच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठार केले असल्याचा दावा केला आहे. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी सांगितले की, इस्त्रायने काल रात्री इराणवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी आणि रिव्होल्युशनरी गार्ड बासिज फोर्सचे प्रमुख जनरल गुलाम रझा सोलेमनी हे ठार झाले आहेत. त्यामुळे आता इराणला आणखी एक मोठा धक्का बसला असून इराण आता इस्त्रायला काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts