• Home
  • लाईफस्टाईल
  • वय वाढलं तरी चेहरा चमकेल! फक्त 4 घटकांतून तयार करा ‘DIY बोटॉक्स जेल’
Top News

वय वाढलं तरी चेहरा चमकेल! फक्त 4 घटकांतून तयार करा ‘DIY बोटॉक्स जेल’

DIY Botox Gel and Natural Skin Care Tips

DIY Botox Gel and Natural Skin Care Tips: तुमचा चेहराही काळवंडलेला दिसतोय आणि महागडी क्रीम्स वापरूनही काही फरक जाणवत नाही का? मग एक्सपर्टने सांगितलेले फक्त 4 घटक वापरून DIY बोटॉक्स जेल तयार करा आणि काही दिवसांतच दिसणारा बदल अनुभवून पहा. चला तर जाणून घेऊया ही सोपी रेसिपी

बदलत्या जीवनशैलीत त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक जण महागड्या कॉस्मेटिक ट्रीटमेंट्सचा आधार घेतात. मात्र प्रसिद्ध ब्युटी एक्सपर्ट यांनी घरच्या घरी तयार करता येणाऱ्या नैसर्गिक स्किन केअर जेलची सोपी पद्धत सांगितली आहे. हे जेल त्वचेला तजेला देण्यासोबतच नैसर्गिक चमक वाढवण्यास मदत करते.

त्यांच्या मते, त्वचेच्या अनेक समस्या किचनमधील सध्या घटकांमधूनही सोडवता येतात. योग्य पद्धतीने वापर केल्यास हे घटक त्वचेला टाइटनेस देणे, बारीक रेषा कमी करणे आणि हेल्दी ग्लो देणे यासाठी उपयुक्त ठरतात.

हेही वाचा : ठाकरेंच्या खासदारांची पुन्हा होणार का फाटाफूट? संजय राऊतांच्या वक्तव्याने वाढली उत्सुकता; म्हणाले…

साहित्य

या नैसर्गिक ग्लो जेलसाठी चार मुख्य घटक लागतात:

लवंग (8 ते 10)
तेजपत्ता
शुद्ध बदाम तेल
ताजे एलोवेरा जेल

जेल कसे तयार करावे?

सर्वप्रथम लवंग आणि तेजपत्ता एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करा किंवा कुटून घ्या. यानंतर १५० मिली पाणी (RO किंवा मिनरल वॉटर) घ्या आणि त्यात लवंग- तेजपत्त्याचे मिश्रण टाकून उकळा, जोपर्यंत पाण्याचा रंग बदलत नाही.

त्यानंतर हे पाणी थोड्या प्रमाणात एका भांड्यात घ्या. जास्त प्रमाणात पाणी वापरू नाक, कारण याला जेलमध्ये रूपांतर करायचे आहे. त्यात ताजे एलोवेरा जेल घालून चांगले मिसळा.

यानंतर 1 ते 1.5 चमचा बदाम तेल घालून मिश्रण पुन्हा एकदा नीट ढवळा. काही मिनिटांत हे मिश्रण जेल स्वरूपात तयार होते. तयार झालेले जेल एअरटाइट डब्यात साठवून ठेवा.

वापरण्याची पद्धत

रात्री चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर या जेलचे काही थेंब चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने 30 ते 50 सेकंद मसाज करा. नियमित वापर केल्यास त्वचा अधिक मऊ आणि उजळ दिसू शकते.

फायदे

त्वचेला नैसर्गिक टाइटनेस मिळण्यास मदत

फाइन लाईन्स कमी होण्यास सहाय्य

त्वचा शांत आणि ताजीतवानी राहते

बदाम तेलामुळे खोलवर पोषण मिळते

सकाळी चेहरा अधिक फ्रेश आणि ग्लोइंग दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts