Breaking News :
  • Home
  • देश
  • 6.5 रिश्टर स्केलच्या भूकंपानं ‘हा’ देश हादरला; राष्ट्रपतींना रद्द करावी लागली वर्षातील पहिली पत्रकार परिषद
Top News

6.5 रिश्टर स्केलच्या भूकंपानं ‘हा’ देश हादरला; राष्ट्रपतींना रद्द करावी लागली वर्षातील पहिली पत्रकार परिषद

Earthquakes In Rajkot

Earthquake in Mexico : अलिकडच्या काळात जगभरातील विविध देशांमध्ये भूकंपाच्या घटना झपाट्यानं वाढत आहेत. भूकंपांमुळं अनेक देशांमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं भूकंपांची भीती वाढत आहे. दरम्यान, शुक्रवारी मेक्सिकोला शक्तिशाली भूकंप आला. या भूकंपामुळं दक्षिण आणि मध्य मेक्सिको हादरलं. तसंच मेक्सिको सिटी आणि अकापुल्कोमधील रहिवासी घाबरुन रस्त्यावर धावत असल्याचं पाहायला मिळालं.

भूकंपाचं केंद्र कुठं होतं? :

मेक्सिकोच्या राष्ट्रीय भूकंप संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी झालेल्या भूकंपाची सुरुवातीची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.5 इतकी होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7:28 वाजता भूकंप झाला. या तीव्र भूकंपाचं केंद्र दक्षिण मेक्सिकन राज्यातील ग्वेरेरोमधील सॅन मार्कोस शहराजवळ, पॅसिफिक किनाऱ्यावर असलेल्या अकापुल्कोच्या रिसॉर्टजवळ होतं. भूकंप जमिनीखाली 40 किलोमीटर खोलीवर होता. (Earthquake in Mexico)

राष्ट्रपतींच्या पत्रकार परिषदेत व्यत्यय :

मेक्सिकोला शुक्रवारी झालेल्या मोठ्या भूकंपामुळं राष्ट्रपती क्लॉडिया शीनबॉम यांच्या नवीन वर्षाच्या पहिल्या पत्रकार परिषदेत व्यत्यय आला. जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीचं तात्काळ वृत्त आलेलं नाही. राष्ट्रपतींनी काही वेळातच पत्रकार परिषद पुन्हा सुरू केली आणि सांगितलं की त्यांनी ग्वेरेरोच्या राज्यपालांशी चर्चा केली आहे.

भूतान आणि म्यानमारमध्ये भूकंप :

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, मेक्सिकोपूर्वी गुरुवारी भारताच्या शेजारील देश भूतानमध्येही भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 होती. रात्री 9:52 वाजता तो झाला. भूकंपाचं केंद्र पृष्ठभागापासून 5 किलोमीटर खाली होते. गुरुवारी म्यानमारमध्येही 4.6 रिश्टर स्केलवर भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचं केंद्र पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खाली होतं.

जगात सर्वाधिक भूकंप जपानमध्ये होतात :

जगात सर्वाधिक भूकंप जपानमध्ये होतात. हे प्रामुख्यानं प्लेट टेक्टोनिक्समुळं होतं. ते रिंग ऑफ फायर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात स्थित आहे. येथे पॅसिफिक प्लेट, युरेशियन प्लेट आणि फिलीपीन प्लेट सारख्या अनेक मोठ्या टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात. त्या एकमेकांखाली सरकतात किंवा घासतात. यामुळं पृथ्वीवर ताण निर्माण होतो आणि अचानक उर्जेचं उत्सर्जन झाल्यामुळं भूकंप होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts