Best Exercises for Full Body Fitness: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तंदुरुस्त राहणे मोठे आव्हान बनले आहे. चुकीची आहारपद्धती, तणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत रोज सकाळी थोडा वेळ व्यायामासाठी देणे अत्यंत फायदेशीर ठरते.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवणे अधिक महत्वाचे झाले आहे. दीर्घ वेळ बसून काम करणे, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे लठ्ठपणा, थकवा आणि विविध आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहेत.
अशा परिस्थितीत दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने करणे आणि सकाळी नियमित व्यायाम करणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे, रोज फक्त ४० मिनिटांचा वर्कआउट देखील शरीराला ऊर्जा देण्यासाठी, मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि दीर्घकाळ निरोगी जीवनशैली टिकवण्यासाठी पुरेसा ठरू शकतो. चला तर जाणून घेऊयात कोणते व्यायाम करावे?
हेही वाचा: सोलापूर विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू; अर्ज करण्याची आजच शेवटची संधी!
स्ट्रेचिंग करा
स्ट्रेचिंग एक्सरसाइज रोज 10 ते 15 मिनिटे करणे पुरेसे असते. हे वर्कआउटपूर्वी आणि वर्कआउटनंतर दोन्ही वेळा केले जाऊ शकते. सकाळी उठल्यानंतर हलके स्ट्रेचिंग केल्यास दिवसभर शरीर सक्रिय राहते. यात तुम्ही नेक स्ट्रेच (मान ताणणे), शोल्डर स्ट्रेच (खांदे ताणणे), साइड स्ट्रेच, हैमस्ट्रिंग स्ट्रेच, कॅट-काऊ स्ट्रेच (योगासन प्रकार) आणि फॉरवर्ड बेंड करू शकता.
सूर्यनमस्कार
सुरुवातीला दररोज 5 ते 10 सूर्यनमस्कार करणे योग्य आहे. हळूहळू क्षमता वाढल्यावर 15 ते 20 किंवा त्याहून अधिकही करता येतात. सकाळी रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार करणे सर्वात फायदेशीर मानले जाते.
योगासने करा
दररोज सकाळी २० ते ४० मिनिटे योगासने करणे अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, त्रिकोणासन, पश्चिमोत्तानासन, वज्रासन आणि शशांकासन यांसारखी आसने करता येतात. रिकाम्या पोटी योग केल्यास त्याचा अधिक चांगला परिणाम दिसून येतो. सुरुवातीला सोपी आसने करून हळूहळू कठीण आसनांकडे प्रगती करावी.












