Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू; अर्ज करण्याची आजच शेवटची संधी!
ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू; अर्ज करण्याची आजच शेवटची संधी!

Solapur University

Solapur University Recruitment 20226: सोलापूर विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू असून अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा.

सोलापूर विद्यापीठात (Solapur University) प्रोफेसर क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाने विविध विषयांतील असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी एकूण १३३ जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख आज, १५ एप्रिल २०२६ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तात्काळ अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी सोलापूर विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट https://su.digitaluniversity.ac/ ला भेट द्यावी.

हेही वाचा: Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला कोणत्या राशींनी काय दान करावे? जाणून घ्या A टू Z माहिती

भरतीची अधिक माहिती

सोलापूर विद्यापीठाने विविध विषयांतील प्रोफेसर पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

संस्था: सोलापूर विद्यापीठ
पदाचे नाव: सहायक प्राध्यापक
एकूण पदे: १३३
नोकरीचे ठिकाण: सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख: आज, १५ एप्रिल २०२६

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयात किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, यूजीसी (UGC) किंवा विद्यापीठाच्या नियमांनुसार इतर पात्रता निकष लागू होऊ शकतात.

अर्ज शुल्क

सामान्य / EWS / SEBC उमेदवार: 500 रुपये
SC / ST / OBC / दिव्यांग उमेदवार: 250 रुपये
(अर्ज शुल्क परत मिळणार नाही)

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड विद्यापीठाच्या नियमांनुसार केली जाईल. शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर आवश्यक निकषांनुसार अंतिम निवड करण्यात येईल.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts