• Home
  • महाराष्ट्र
  • दहशत कमी झाल्याच्या संशयानंतर पुन्हा वर्चस्व गाजवण्यासाठी निलेश घायवळ यांनी रचला होता कट; 6455 पानाचे दोषारोपपत्र कोर्टात दाखल
Pune

दहशत कमी झाल्याच्या संशयानंतर पुन्हा वर्चस्व गाजवण्यासाठी निलेश घायवळ यांनी रचला होता कट; 6455 पानाचे दोषारोपपत्र कोर्टात दाखल

Nilesh Ghaywal Chargesheet Case

Nilesh Ghaywal Chargesheet Case : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त वाढत चालले आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यात गोळीबार झाला होता. त्यातील आरोपी तथा पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीतील 9 गुन्हेगारांवर गुन्हे शाखेने 6 हजार 455 पानांचे दोषारोप कोर्टात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या टोळीतील 9 गुन्हेगारांवर दोषारोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आले असु मिळालेल्या माहितीनुसार गणेश विसर्जनाच्या दिवशी गोळीबाराचा कट रचल्याचे समोर आले आहे. आणि हे या दोषारोप पत्रात देखील नमूद करण्यात आले आहे. या दोषारोपपत्रात मयूर ऊर्फ राकेश गुलाब कुंबरे, मयंक मॉन्टी विजय व्यास, गणेश सतीश राऊत, दिनेश राम फाटक, आनंद अनिल चांदलेकर, मुसाब ईलाही शेख, जयेश कृष्णा वाघ, अक्षय दिलीप गोगावले, अजय महादेव सरोदे यांची नावे आहेत.

हे ही वाचा : सावकारी तगादा लावल्यांने वैजापुरात व्यापाऱ्याची व्हिडिओ काढून गळफास घेत आत्महत्या

8 जण फरार

या प्रकरणातील गोळीबाराच्या गुन्ह्यातील तपासामध्ये एक पिस्तूल आणि एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे. तर निलेश घायवळ यांच्या घराची झडती घेतल्यानंतर दोन जिवंत काडतुसे आणि चार रिकाम्या पुंगळ्या देखील हस्तगत करण्यात आल्या आहे. त्यासोबतच 9 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. आणि आणखी 8 जण फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी रचला होता कट

कोथरूड परिसरामध्ये आपल्या टोळीची दहश कमी झाली असून दहश पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि वर्चस्व गाजवण्यासाठी निलेश घायवळ यांनी कट रचल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. एवढेच नाही तर काही दिवसांत हमराज चौक आणि शास्त्रीनगर परिसरात मोठी दहशत निर्माण करा, शस्त्रे आणि पैसे मी पुरवेल, तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर बाहेर काढण्याची जबाबदारी माझी राहील, अशी चेतावणी निलेश घायवळने साथीदारांना दिली होती असं या तपासातुन समोर आले. हा संपूर्ण कट गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच 6 सप्टेंबर 2025 रोजी रचण्यात आल्याची माहिती समोर आली असून याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मकोका अंतर्गत कारवाई

मुठेश्वर मित्रमंडळ चौकाजवळ गप्पा मारत उभे असलेल्या नागरिकांवर ठरवलेल्या कटानुसार 17 सप्टेंबरच्या दिवशी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गुंडांनी गोळीबार केला. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी दखल घेत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत आरोपींवर कारवाई केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts