• Home
  • राजकारण
  • पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 40 मिनिटं फोनवर संभाषण; संभाषणात काय घडलं?
ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 40 मिनिटं फोनवर संभाषण; संभाषणात काय घडलं?

2025021407f 1 scaled

Middle East Conflict : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात युद्धविराम होऊनही मध्य-पूर्वेत तणाव कायम आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump) हे देखील इराणला सातत्यानं धमक्या देत आहेत. या देशांमध्ये पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची भीती वाढत आहे. मध्य-पूर्वेतील या परिस्थितीत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. सूत्रांनुसार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर संवाद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते 40 मिनिटं बोलले.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्ली-डेहराडून द्रुतगती मार्गाचे उद्घाटन; आता अडीच तासात

चर्चेचे मुद्दे काय :

अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नाकेबंदीवर चर्चा केली. अमेरिकेच्या राजदूतांनी असंही सांगितलं की, येत्या काही दिवसांत आणि आठवड्यांत भारत आणि अमेरिका यांच्यात ऊर्जा क्षेत्रासह अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.

आम्ही तुमच्यावर प्रेम करतो – ट्रम्प :

भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संभाषणाची माहिती दिली आहे. सर्जिओ गोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं, “मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आम्ही तुमच्यावर प्रेम करतो.” सर्जिओ गोर म्हणतात की भारत-अमेरिका संबंध मजबूत स्थितीत आहेत.

पंतप्रधान मोदींनी माहिती दिली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या संभाषणाबद्दलही माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर सांगितलं, “माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मला फोन आला होता. आम्ही विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला. आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये आमची व्यापक जागतिक सामरिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही पश्चिम आशियातील परिस्थितीवरही चर्चा केली आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली व सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर भर दिला.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts