Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुण्यात हवामानाचा अचानक पलटवार! पुढील काही तासांत जोरदार पावसाचा अंदाज
Pune

पुण्यात हवामानाचा अचानक पलटवार! पुढील काही तासांत जोरदार पावसाचा अंदाज

Pune alert

Pune Rain Alert: राज्यात उष्णतेचा तडाखा कायम असतानाच पुणे- मुंबईत मात्र हवामानाने अचानक करवट घेतली आहे. पूर्व-मौसमी पावसाच्या सरींनी पुणेकरांना दिलासा दिला असून पुढील 36 ते 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बाणेर, औंधसह अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात होते. मात्र वातावरणातील बदलामुळे आता ढगाळ हवामान, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: महायुतीत जुंपली! संजय शिरसाट यांचे वक्तव्य, राष्ट्रवादीच्या जिव्हारी…

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. त्यामुळे काही भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात.

दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम असून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, नैऋत्य मान्सून 26 मेच्या सुमारास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून जूनच्या पहिल्या आठवड्यात तो महाराष्ट्रात पोहोचू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts