• Home
  • राजकारण
  • शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाकीत; महाविकास आघाडीत अजित पवार परत येणार
Mumbai

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाकीत; महाविकास आघाडीत अजित पवार परत येणार

Ajit Pawar Return to Maha Vikas Aghadi

Ajit Pawar Return to Maha Vikas Aghadi : आज सकाळच्या सुमारास संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

यंदा झालेल्या महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या होत्या. महापालिका निवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोघांनी मिळून एकत्र लढवली होती. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहे. त्यासाठी आता राजकीय पक्ष तयारीला लागले असून राष्ट्रवादी अजित पवार गटाने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली होती. परंतु आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठा राजकीय दावा केला आहे.

अजित पवारांचे मन कुटुंबियांकडे

भविष्यात शरद पवार आणि अजित पवार महाविकास आघाडीत एकत्र दिसतील असे भाकीत संजय राऊत यांनी केले आहे. अजित पवारांचे मन कुटुंबियांकडे असून ते महायुती सोडून महाविकास आघाडीत येणार असल्याची भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली आहे. त्यांचे हे भाकीत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवण्याची शक्यता आहे.

शरद पवार अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीत येणार का

महापालिका निवडणुकी भाजप शिंदे, आघाडी, युती, ठाकरे बंधू हे सर्व एकत्र लढताना दिसून आले. पुणे, पिंपरीसह अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणूक एकत्र लढवली. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलाय तर तुमच्यासोबत नसतील का असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर संजय राऊत यांनी थेट प्रत्युत्तर न देता नवीन प्रश्न समोर आणला. शरद पवार अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीत येणार का असा विचार का केला जात नाही ? असा उलट प्रश्न त्यांनी विचारला.

शरद पवार हे आमच्या सोबत

भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र महाविकास आघाडीत दिसणार. अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवारांसोबत युती करणार आहे. त्यांचे मन कुटुंबीयांकडे आहे. म्हणूनच कुटुंब महाविकास आघाडीत एकत्र येणार असल्याचे भाकीत संजय राऊत यांनी केले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर शरद पवार बाहेर पडणार का असा विचार कशाला करतात. शरद पवार आणि अजित पवार दोघेही महाविकास आघाडीत येणार का ? असं का विचारत नाही. कारण शरद पवार हे आमच्या सोबत असून त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. आणि अजित पवार यांचा पक्ष युतीत आहे. असं देखील राऊत म्हणाले.

कधीतरी अजितदादांना बाहेर पडावं लागणार

भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्रित महाविकास आघाडीत दिसू शकतील. कधीतरी अजितदादांना बाहेर पडावं लागणार. दोन दगडावर पाय कसा ठेवता येणार? काही तरी एक सोडावं लागेल ना? असे देखील ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts