Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • “अशा मंत्र्यांना घरी पाठवा;” बांगरांनी पक्षश्रेष्ठींसमोर फोडली डरकाळी, शिंदे सेनेत दुफळी..
Top News

“अशा मंत्र्यांना घरी पाठवा;” बांगरांनी पक्षश्रेष्ठींसमोर फोडली डरकाळी, शिंदे सेनेत दुफळी..

Shinde Sena Rift
65

Shinde Sena Rift : शिंदे सेनेतील मोठा अंतर्गत वाद समोर येताना दिसत आहे. ऑपरेशन टायगरची (Operation Tiger) चर्चा मागे सरते ना सरते तोच शिवसेनेतील खदखद बाहेर आली आहे. शिंदे सेनेतील ( Shinde Group) काही आमदार त्यांच्याच मंत्र्यांवर नाराज असल्याचे दिसून आले आहे. आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी पक्षश्रेष्ठींपुढे फोडलेल्या डरकाळी मुळे पक्षाअंतर्गत (Intra-party disputes) दुफाळी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

संतोष बांगर हे शिंदे सेनेत दाखल झाल्यापासून त्यांनी काही मुद्यांवर आक्रमक पवित्रा दाखवला आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या आक्रमक शैलीने आणि बेताल वक्तव्याने मागील वर्ष गाजले होते. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतर हे दोन्ही नेते राष्ट्रीय स्तरावर गाजले होते. आता संतोष बांगर यांनी राज्य सरकारलाचा धारेवर धरले असून महायुती सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. यामुळे विरोधकांना टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे.

हेही वाचा – मोठी घोषणा! नोकरभरतीपासून विकास प्रकल्पांपर्यंत मंत्रिमंडळाचे 7 मोठे निर्णय, 6 जिल्ह्यांना विशेष गिफ्ट

स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आढावा बैठक होती. ही बैठक अनेक कारणांनी गाजली. सध्या मराठवाड्यातील काही ठिकाणी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याचे दिसून येते. धाराशिवमध्ये शिवसेनेतील उभी दुफळी ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. तर इतर जिल्ह्यातीलही नेत्यांमधील विसंवाद आणि कार्यकर्त्यांची नाराजी उघड झाली आहे.

दुफळीचा फटका बसण्याची भीती

आतापर्यंत स्थानिक पातळीवर असलेली नाराजी आता नेत्यांपर्यंत येवून पोहोचली आहे. काही नेत्यांकडून तर ती जाहिररीत्या समोर आणली जात आहे. यावर पक्षाने वेळीच काही धोरण ठरवले नाही तर अंतर्गत विसंवाद वाढून शिंदे सेनेला दुफळीचा फटका बसण्याची भीती त्यांच्याच पक्षातील कार्यकत्यांकडून व्यक्त केली जात आहे. सत्तेत असूनही निधी वाटपातील अन्याय, अनेक ठिकाणी कामे न मिळण्याची तक्रार, तर कामे करण्यासाठी वारंवार तगादा लावावा लागत असल्याची ओरड कार्यकर्ते करत आहेत.

नांदेडमध्ये बांगरांनी फोडली डरकाळी

नांदेड येथील शिंदे सेनेच्या आढावा बैठकीत आमदार संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना पक्ष श्रेष्ठींसमोर आणली. त्यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला. खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. त्यांच्या या आक्रमकपणामुळे काही काळ बैठकीचं वातावरण तापल्याने त्याला गंभीर स्वरूप आलं. विशेष म्हणजे त्याच्या आक्रमकतेला कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. मनातील खदखद त्यांनी बाहेर काढली. मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. डोक्यात हवा गेलेल्या मंत्र्यांना अगोदर घरी बसवा, असा घरचा आहेर आमदार संतोष बांगर यांनी पक्षाला दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts