• Home
  • महाराष्ट्र
  • VSR च्या मालकाकडून पिंकी माळी यांच्या भावाला धमकी; अमोल मिटकरींचा धक्कादायक खुलासा, म्हणाले, अंडरवर्ल्डशी संबंध…
Top News

VSR च्या मालकाकडून पिंकी माळी यांच्या भावाला धमकी; अमोल मिटकरींचा धक्कादायक खुलासा, म्हणाले, अंडरवर्ल्डशी संबंध…

mitkari 1

Ajit Pawar Plane Crash | राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्वांना मोठा धक्का बसला होता. तर त्यांच्या अपघाताबाबत अनेक शंका निर्माण केल्या जात आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताला (Ajit Pawar Plane Crash) आता एक महिना होऊन गेला असून या अपघाताबाबत संशय निर्माण केला जात आहे. अजित पवारांचा घातपात आहे की अपघात, असा सवाल सध्या निर्माण होताना दिसत आहे. तर सध्या या अपघात प्रकरणाचा तपास सीआयडीकडून (CID) केला जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

हेही वाचा – LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बुकिंग नियम बदलले, आता सिलिंडरसाठी इतके दिवस वाट पाहावी लागणार

आमदार अमोल मिटकरी यांनी व्हीएसआर (VSR) कंपनीचे मालक व्ही.के.सिंग (V.K.Singh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. व्ही.के.सिंग यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा संशय देखील मिटकरींनी व्यक्त केला. त्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

VSR कंपनीच्या मालकाकडून पिंकी माळींच्या कुटुंबियांना धमकी

आज (9 मार्च) आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पिंकी माळी यांच्या आईची रूग्णालयात जाऊन भेट घेतली. पिंकी माळी यांच्या आईची भेट घेतल्यानंतर अमोल मिटकरींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत धक्कादायक खुलासा केला.

अमोल मिटकरी म्हणाले की, आज मी पिंकी माळी यांच्या आईला जाऊन भेटलो. तेव्हा मला त्यांच्या आईने एक ऑडिओ क्लिप ऐकवली. तर या अपघात प्रकरणाबाबत माध्यमांसमोर जाऊन बोलू नका, अशी थेट धमकी पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे, असा गौप्यस्फोट मिटकरींनी केला.

VSR कंपनीच्या मालकाचे अंडरवर्ल्डशी संबंध?

याबाबत अमोल मिटकरींनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, गेल्या तेरा दिवसांपासून उपचार घेत असलेल्या पिंकी माळी यांच्या आईच्या तब्येतीची आज हॉस्पिटलला जाऊन विचारपुस केली. यावेळी पिंकी माळी यांचे वडील व भाऊ उपस्थित होते. VSR चा मालक VK सिंग याने व्हॉट्सअप कॉल करून मीडियापासुन दूर राहण्याची भावाला धमकी दिल्याचे रेकॉर्डींग कॉल वर ऐकले.ज्यात पायलटने, “अजित पवार इनके फ्लाईट को ठोक दिया” अशी वापरलेली भाषा ही VSR चे अंडरवर्ल्डशी संबंध तर नाही ना? अशी शंका उपस्थित करते ..एक मात्र खरंय हे प्रकरण वरवर जसं दिसतंय तसं सोपं नाहीये. आपल्या दादांचा घात झालाय”, असा खुलासा मिटकरींनी केला आहे.

तसेच व्ही.के.सिंगचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत आणि व्ही.के.सिंगची नार्को टेस्ट करा, अशी मागणी देखील अमोल मिटकरी यांनी केली आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून सीआयडीच्या पथकाकडून व्हीएसआर (VSR) कंपनीचे मालक व्ही.के.सिंग यांची चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान व्ही.के.सिंग यांनी अपघातावेळी कोणाची चूक होती आणि हा अपघात कसा घडला याबाबत खुलासा केला. वैमानिक सुमित कपूर यांच्याकडून झालेल्या चुकीमुळे विमानाचा भीषण अपघात घडला असावा, असा खळबळजनक दावा व्ही.के.सिंग यांनी आपल्या जबाबात केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts