• Home
  • महाराष्ट्र
  • हवामान खात्याचा अलर्ट; वर्धा जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी जाहीर
ताज्या बातम्या

हवामान खात्याचा अलर्ट; वर्धा जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी जाहीर

wardha

School Holiday Wardha: वर्धा जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट पाहता 16 एप्रिल रोजी अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

वर्धा | प्रतिनिधी

उष्णलाटेच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना दि. 16 एप्रिल रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी यासंदर्भात आदेश निर्गमित केले आहेत.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वर्धा जिल्ह्यात 16 एप्रिल रोजी तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अत्यंत उष्ण हवामानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

हवामान विभागाने यापूर्वीच जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून, मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. उष्मालाटेची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व अंगणवाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळा 16 एप्रिल रोजी बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts