• Home
  • मनोरंजन
  • Bigg Boss Season 6 : बिग बॉसमध्ये मेहनतीचा दरवाजाने एंट्री केलेली ती स्पर्धक पहिल्याच टास्कमध्ये झाली फेल
मनोरंजन

Bigg Boss Season 6 : बिग बॉसमध्ये मेहनतीचा दरवाजाने एंट्री केलेली ती स्पर्धक पहिल्याच टास्कमध्ये झाली फेल

Bigg Boss Marathi Season 6 contestant from Mehnaticha Darwaza fails first task

Bigg Boss Marathi Season 6 contestant fails task : 11 जानेवारीपासून बिग बॉस मराठी सिझन 6 ला सुरुवात झाली असून बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये भांडण जुंपल्याचे बघायला मिळाले. काल म्हणजेच 12 जानेवारी रोजी रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत ग्रँड प्रीमियम सोहळा पार पडला. आता बिग बॉसचा पहिला भाग ऑन एअर करण्यात आला आहे.

कसा असेल पहिला भाग

बिग बॉस सिझन 5 हा लोकप्रिय झाल्यानंतर आता प्रेक्षकांना या सिझनची फार उत्सुकता लागून होती. यंदाच्या सिझन मध्ये कोण कोण स्पर्धक असणार ? कोणकोणते टास्क दिले जाणार ? हे सर्व प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे. बिग बॉसच्या पहिल्या भागात तन्वीरुचिता, विशाल प्रभू यांच्यामध्ये भांडण झाल्याचे बघायला मिळाले. आता बिग बॉसच्या घरात पहिला राशन टास्क चांगलाच रंगणार आहे. या सिझन मध्ये मिशन राशन पार पडणार आहे. हा घरातील महत्वपूर्ण आणि पहिला टास्क असेल.

कसा होता मेहनतीचा दरवाजा

काल बिग बॉस मराठीच्या घरात ‘मेहनतीचा दरवाजा’ निवडून आलेल्या 17 स्पर्धकांनी आता टास्कला सुरुवात केली असून हे स्पर्धक स्टोअर रूममधून भांडी आणताना दिसत आहेत. याशिवाय प्रभू शेळके स्विमिंग पूलमधून पाणी काढताना दिस आहे. म्हणजेच या स्पर्धकांना देण्यात आलेला हा पहिला टास्क भांडी घासण्याचा होता. आणि हा मेहनतीचा टास्क पूर्ण केल्यानंतर स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात एंट्री मिळाली.

हे ही वाचा : ‘मर्दानी 3’ चा थरारक ट्रेलर रिलीज; राणी मुखर्जी पुन्हा शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत, बाल तस्करांविरोधात निर्णायक लढा

ही स्पर्ध पडली बेशुद्ध

अख्ख्या जिल्ह्याची भांडी दिलीत का घासायला… असा सवाल दिव्या शिंदे हिने केल्याचे प्रोमो मध्ये दिसतंय. त्यानंतर ती गार्डन एरियात येऊन बेशुद्ध होऊन खाली पडताना दिसत आहे. आता राशन टास्क कसा पूर्ण होईल हे पाहणे आणखीनच मजेदार ठरणार आहे. या टास्क मध्ये दिव्या शिंदेची झालेली अवस्था पाहून सर्व सदस्यांना चांगलाच घाम फुटला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट

बिग बॉसचा हा भाग ऑन एअर केल्यानंतर सोशल मीडियावर हा भाग कसा वाटला ? असा सवाल कलर्स मराठीने प्रेक्षकांना विचारला आहे. आता बिग बॉच्या पहिल्या भागात काय मजा येणार हे पाहणे योग्य ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts