• Home
  • मनोरंजन
  • धुरंधर चित्रपट 600 कोटींचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर; छावा, स्त्री 2 ला टाकणार मागे
मनोरंजन

धुरंधर चित्रपट 600 कोटींचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर; छावा, स्त्री 2 ला टाकणार मागे

Dhurandhar movie nearing 600 crore box office milestone

Dhurandhar Movie 600 Crore Box Office : 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट 17 व्या दिवसानंतर देखील चर्चेत आहे. या चित्रपटाने हिंदी सिनेसृष्टीत धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत ऐतिहासिक धडाकाच लावलाय असं म्हणावे लागेल. कारण धुरंधर या चित्रपटाने आज 598.90 कोटींचा टप्पा गाठला आहे. तर 600 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी आता आजच्याच दिवस पुरेसा आहे. हा चित्रपट छावा, स्त्री या चित्रपटांना देखील मागे टाकण्याच्या तयारीत असून धुरंधर चित्रपट आता टॉप लीग मध्ये आला आहे.

आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केलंय. या चित्रपटाने सोमवारी 598.90 कोटींवर कमाई केली. आता 600 कोटींचा टप्पा गाठणे काही अवघड नाही. त्यानुसार आता ट्रेड विश्लेषकांच्या मते आजच्या आज हा चित्रपट 600 कोटींचा टप्पा गाठेल. या चित्रपटाचे अनेक सीन सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असून धुरंधर मधील खलनायकाची भूमिका साकारणारे अक्षय खन्ना देखील काही आठवड्यापासून चांगलेच चर्चेत आहे. त्यांचा अभिनय, डायलॉग, डान्स सर्वकाही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतोय. आता चित्रपटाच्या कमाईमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असून आता अनेक चित्रपटांना मागे टाकण्यासाठी हा चित्रपट तयार आहे.

आतापर्यंतची धुरंधरची कमाई

धुरंधरच्या आतापर्यंतच्या कमाई बद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाची तिसऱ्या आठवड्यात देखील ही कमाई थांबलेली नाही. भारतात धुरंधरने 598.90 कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारी हा आकडा 23.70 कोटी एवढा होता. तर शनिवारी 35.70 कोटी, रविवारी 40.30 कोटी आणि सोमवारी 19.70 कोटी एवढा होता. म्हणजे या चित्रपटाने भारतात एकूण 598.90 कोटींची कमाई केली आहे.

हे ही वाचा : 300 कोटींचा टप्पा पार केलेल्या चित्रपटाला उध्वस्थ करेल..; नेमके आहे तरी काय या व्हिडिओत ?

छावाला टाकणार मागे

छावा हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतील आकर्षक कमाई करणारा चित्रपट बनला होता. परंतु आता धुरंधरची झपाट्याने होणारी कमाई पाहता छावा चित्रपटाचा देखील रेकॉर्ड धुरंधर मोडणार असं दिसत आहे. आजच धुरंधर भावाला मागे टाकेल असे निष्कर्ष ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती शेकेली.

सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल

ट्रेंड रिपोर्टनुसार गुरुवारी म्हणजेच ख्रिसमसच्या मुहूर्तावर धुरंधर चित्रपट स्त्री 2 ला मागे टाकण्याच्या तयारीत आहे. धुरंधरने हिंदी सिनेसृष्टीतील स्त्री 2 या चित्रपटाला मागे टाकल्यास हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतील इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल. असे मत तर आदर्श यांनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts