Drishyam 3 Release: आज २१ मे रोजी मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा बहुप्रतिक्षित थ्रिलर ‘दृश्यम 3’ अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील थरारक सीन आणि जबरदस्त ट्विस्ट पाहून प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले आहेत. चला तर जाणून घेऊया या चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती.
आज २१ मे रोजी मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा बहुप्रतीक्षित थ्रिलर ‘दृश्यम 3’ अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील थरारक सीन, जबरदस्त ट्विस्ट आणि सस्पेन्स पाहून प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले आहेत. सोशल मीडियावरही चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून चाहते अनेक दृश्यांचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.
हेही वाचा: वाद मिटवण्यासाठी सुनेत्रा पवारांची मोठी खेळी, पटेल-तटकरेंच्या जागी बदली जोडी
दिग्दर्शक जीथू जोसेफ यांच्या ‘दृश्यम’ मालिकेने याआधीच प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पहिल्या दोन भागांप्रमाणेच तिसऱ्या भागातही सस्पेन्स, भावनिक संघर्ष आणि बुद्धिमत्तेचा जबरदस्त खेळ पाहायला मिळत आहे.
पुन्हा एकदा जॉर्जकुट्टीचा संघर्ष
या चित्रपटात मोहनलाल पुन्हा एकदा जॉर्जकुट्टीच्या भूमिकेत दिसत आहेत. शांत आणि साधं आयुष्य जगणाऱ्या जॉर्जकुट्टीच्या भूतकाळातील घटना पुन्हा समोर येतात आणि त्याच्या कुटुंबासमोर नवं संकट उभं राहतं.
कथा जसजशी पुढे सरकते, तसतसे अनेक धक्कादायक खुलासे समोर येतात. चित्रपटातील अनपेक्षित ट्विस्टमुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहतात.
अॅडव्हान्स बुकिंगलाही मोठा प्रतिसाद
‘दृश्यम 3’च्या अॅडव्हान्स बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. जागतिक स्तरावर चित्रपटाच्या प्री-सेल्सने सुमारे 21 कोटी रुपये ग्रॉसचा टप्पा ओलांडला असून आकडे सातत्याने वाढत आहेत.
केरळ : अंदाजे 5.50 कोटी ग्रॉस
भारतात एकूण : जवळपास 9 कोटी ग्रॉस
आंतरराष्ट्रीय बाजार : विशेषतः गल्फ देशांमध्ये मोठी मागणी
उत्तर अमेरिका, यूके आणि ऑस्ट्रेलियामधूनही चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत आहे. रिलीजपूर्वीच चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगने 25 कोटींचा टप्पा पार केल्याची चर्चा आहे.
स्टारकास्ट
मोहनलालसोबत या चित्रपटात अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
मीना
अन्सिबा हसन
एस्थर अनिल
मुरली गोपी
सिद्दिक
आशा शरथ
शांती मायदेवी
वीणा नंदकुमार
OTT रिलीजची शक्यता
थिएटर रिलीज नंतर हा चित्रपट Amazon Prime Video वर जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









