• Home
  • मनोरंजन
  • ‘Single Papa’ वेब सिरीजमध्ये अभिनेता कुणाल खेमू दिसणार नव्या रूपात; 12 डिसेंबरला होणार रिलीज
मनोरंजन

‘Single Papa’ वेब सिरीजमध्ये अभिनेता कुणाल खेमू दिसणार नव्या रूपात; 12 डिसेंबरला होणार रिलीज

Kunal Khemu in a new avatar from the Single Papa web series releasing on 12 December

Kunal Khemu Single Papa web series : बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू आता एका नवीन वेब सिरीज मध्ये दिसणार आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून लवकरच ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. सध्या या वेब सिरींजची सोशल मीडियावर चर्चा रंगल्याचे दिसत आहे.

ट्रेलर रिलीज

लवकरच कुणाल खेमू हा अभिनेता सिंगल पापा या वेब सिरीज मध्ये दिसणार आहे. मंगळवारी या वेब सीरिजचे ट्रेलर रिलीज करण्यात आले. या ट्रेलर मध्ये कुणाल खेमू हे अत्यंत वेगळ्या रूपात दिसत असून या वेब सिरीजच्या प्रदर्शित होण्याची चाहते वाट पाहत आहे. या ट्रेलर मध्ये समजते की, ही वेब सिरीज अत्यंत कॉमेडी असणार आहे. कॉमेडीचा डबल डोस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा : लग्नानंतर समंथाची दुसऱ्या पतीने देखील केली फसवणूक; जवळच्या व्यक्तीने केला खळबळजनक खुलासा सोशल मीडियावर चर्चाना उधाण

कधी होणार रिलीज

या वेब सिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या पोस्ट मध्ये कॅप्शन देण्यात ले आहे की, खूप जास्त प्रेम, आणि खूप जास्त तक्रारी, गेहलोत कुटुंबाचा तमाशा लवकरच उघड होणार… ‘सिंगल पापा’ पाहा, लवकरच फक्त Netflix वर… या वेबसिरीज पाहताना तुम्हाला कॉमेडीचा डबल पिटारा मिळणार आहे. ही वेबसिरीज 12 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स वर स्ट्रीम करण्यात येणार आहे. यामध्ये कुणाल खेमू सोबतच प्राजक्ता कोळी, मनोज पाहवा, आयशा रजा दिसणारा हे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

काय आहे या वेब सिरीजची कहाणी

या वेब सिरीज च्या ट्रेलर मध्ये सुरुवातीला कुणाल खेमू ला एक लहान बाळ सापडतं. या बाळाला ते घरी घेऊन येतात. त्यानंतर कोर्टरूम मधील सिन दिसतो. जिथे त्याची पत्नी त्याला डिव्होर्स देण्यास सांगते. त्यानंतर कथा पुढे सरकते. आणि पुढील सिन मध्ये कुणाल त्या बाळाला दत्तक घेणार असल्याचे सांगतो. त्यानंतर कुटुंबातील सदस्य परेशान झाल्याचे दिसते. जो व्यक्ती स्वतःचे काम करू शकत नाही तो एका बाळाला कसं सांभाळणार. हा या वेब सिरीज मधील डायलॉग आहे. या गहलोत फॅमिली मध्ये रोज नवनवीन अडचणी येतात. त्यावेळी संपूर्ण फॅमिलीची फजिती आणि होणारी कॉमेडी पाहायला ट्रेलर मध्ये मजा येते.

सिंगल पापा या वेब सिरीज मधील रोमिला नेहराची भूमिका साकारणारी नेहा धुपिया म्हणाली कि, मी स्वतः एक पालक असल्यामुळे मला कुटुंबात होणारा गोंधळ, प्रेम, भांडण हे सर्व काही मला खूप भावलं. पालकटावं खरंच सोपं नसतं. परफेक्ट तर अजिबातही नाही. हि वेब सिरीज विनोदी आणि भावना यांचे अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. या वेब सिरींजचा भाग होणे माझ्यासाठी छान अनुभव होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts