• Home
  • मनोरंजन
  • पलाश मुच्छलची मूव्हऑन नंतर नवी सुरुवात; श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार
मनोरंजन

पलाश मुच्छलची मूव्हऑन नंतर नवी सुरुवात; श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार

Palash Muchhal New Film Direction

Palash Muchhal New Film Direction : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि प्रसिद्ध संगीतकार दिग्दर्शक पलाश मुच्छल चर्चेत होते. क्रिकेटर स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल हे लग्नगाठ बांधणार होते. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पलाश मुच्छलने स्मृतीला धोका दिल्यामुळे त्यांचे लग्न मोडल्याचा चर्चा होत्या. या प्रकरणानंतर स्मृती मंधानाने मूव्ह ऑन करत क्रिकेट टीम मध्ये पुन्हा पदार्पण केले. त्यानंतर आता पलाश मुच्छल नवीन चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.

प्रसिद्ध संगीतकार आणि दिग्दर्शक पलाश मुच्छल नवीन आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. आणि या चित्रपटात श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याबाबत ट्रेंड विश्लेषरण आदर्श यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली आहे. या नवीन चित्रपटात श्रेयस तळपदे सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका नक्कीच चाहत्यांचे मन जिंकून घेईल.

हे ही वाचाअक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा झाला अपघात; रिक्षाचालक जखमी; जाणून घ्या कसा घडला अपघात

पलाश मुच्छल ट्रोल

या चित्रपटाबाबत अद्याप तरी कोणतीही माहिती उपलब्ध झाली नसून पलाश मुच्छल आणि स्मृती मंधाना यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा रंगल्यानंतर दोघांनी नाते संपुष्टात आल्याचे सांगत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. परंतु पलाश मुच्छलला आता चाहत्यांनी प्रचंड ट्रोल केले आहे. चाहत्यांनी कमेंट सेक्शन मध्ये पलाश मुच्छलचा चांगलाच कान पिळला असून अनेकांनी कमेंट बॉक्स मध्ये त्याला चांगलंच सुनावलं आहे. या कमेंट बॉक्स मध्ये एकाने अशी कमेंट केली आहे की, या फोटो मधून चीटरला काढून टाका. तर दुसरा म्हणतो की, या चित्रपटाला नाईट बिफोर वेडिंग असं नाव द्यायला पाहिजे.

श्रेयस तडपदे मुख्य भूमिकेत

मराठी अभिनेता श्रेयस तळपदे यांनी अनेक चित्रपटात भूमिका साकारली असून वेगवेगळ्या भूमिकेत प्रभावी अभिनय बघायला मिळतो. त्याचा अभिनय, भावनिक धीर गंभीर अशा अनेक भूमिका मनाला भिडतात. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागून आहे. परंतु दिग्दर्शक पलाश मुच्छल करत असल्याने मात्र एकीकडे नाराजीचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts