• Home
  • मनोरंजन
  • राणी मुखर्जीचा निर्भीड-दमदार, पावरफुल अंदाज दर्शवणारा मर्दानी 3; वास्तववादी थ्रिलर चित्रपट
मनोरंजन

राणी मुखर्जीचा निर्भीड-दमदार, पावरफुल अंदाज दर्शवणारा मर्दानी 3; वास्तववादी थ्रिलर चित्रपट

Mardaani 3 Review Rani Mukerji

Mardaani 3 Review Rani Mukerji : सतत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आलेली अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी. अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या प्रत्येक चित्रपटात आपली छाप सोडते. आज राणी मुखर्जीचा मर्दानी 3 हा चित्रपट प्रदर्शित झाला. मर्दानी 1, मर्दानी 2 नंतर मर्दानी 3 मध्ये देखील राणी मुखर्जीचा दमदार अभिनय दिसून येत आहे. तीव्र, वास्तववादी आणि खिळवून ठेवणारा हा चित्रपट आहे.

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा चित्रपट

ट्रेंड विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मर्दानी 3 चित्रपटाच्या रिव्ह्यूसंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. अभिराज मिनावाला यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. दिग्दर्शकाने हा चित्रपट प्रभावी थ्रिलर पद्धतीने साकारला असून या चित्रपटाचे कथानक बहुतांश ठिकाणी धारदार वाटते. तीव्र, वास्तव दर्शवणारा आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा चित्रपट असून धैर्य, न्यायासाठी ही लढाई प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम करते. याशिवाय चित्रपटात दाखवण्यात आलेले भावनिक प्रसंग प्रभावीपणे मनाला भिडताना दिसतात.

कहाणी आणखीच परिणामकारक ठरली असती

मर्दानी 3 चित्रपटाच्या मध्यांतर नंतर पुढील भागात लेखनाची कमी जाणवते. लेखन आणखी स्पष्ट असायला हवं होतं. खासकरून खलनायकाच्या ट्रॅकचे स्पष्टीकरण सोप्या पद्धतीत दिल असतं तर प्रभाव वाढला असता. याशिवाय चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात कोलंबो ट्रॅक रंजक दिसत असला तरी देखील तिथपर्यंत पोहोचेपर्यंत दर्शवण्यात आलेले प्रसंग हे अधिक ठोसपणे लिहिण्या आले असते तर चित्रपटाची कहाणी आणखीच परिणामकारक ठरली असती.

राणी मुखर्जी प्रत्येक फ्रेममध्ये स्वतःची छाप सोडते

शिवानी शिवाजी रॉय हे पात्र साकारणारी राणी मुखर्जी या चित्रपटात प्रभावी पोलीस पात्रा दिसत आहे. राणी मुखर्जीच्या अभिनयाबाबत बोलायचं झालं तर, तिचा स्क्रीन प्रेझेन्स, कठोर निर्धार आणि भावनिक खोली ही लक्षवेधून घेते. अभिनेत्री राणी मुखर्जी प्रत्येक फ्रेममध्ये स्वतःची छाप सोडते. या चित्रपटातुन राणी मुखर्जीने पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवले.

खलनायकाची भूमिका प्रभावी

चित्रपटा खलनायिकेची भूमिका साकारणारी अम्माची भूमिका भयावह आणि प्रभावी पद्धतीने मांडण्यात आली आहे. तर रामानुजन याचा भिनय देखील लक्ष वेधून घेतो. या दोन्ही कलाकारांची निवड हीच या चित्रपटाचा प्लस पॉईंट ठरल्याचं मत ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी मांडले आहे. अम्मा या खलनायिकेचे पात्र मल्लिका प्रसाद यांनी साकारले असून प्रजे कश्यप याने रामानुजन हे पात्र साकारले आहे. चित्रपटातील फातिमा हे पात्र जानकी बोदीवाला यांनी साकारले असून आत्मविश्वास आणि प्रशंसनीय अभिनय तिने या चित्रपटात केला आहे.

हे ही वाचा‘मर्दानी 3’ चा थरारक ट्रेलर रिलीज; राणी मुखर्जी पुन्हा शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत, बाल तस्करांविरोधात निर्णायक लढा

साजेसा, दमदार आशयपूर्ण सिनेमा

चित्रपटातील पार्श्वसंगीत अप्रतिम असून ऍक्शन कोरिओग्राफी चित्रपटाचा अनुभव आणखी उंचावण्यास मदत करते. मर्दानी चित्रपटाच्या फ्रेंचाझीला साजेसा, दमदार आणि आशयपूर्ण सिनेमा आहे. तुम्हाला जर वास्तववादी थ्रिलर चित्रपट आवडत असेल तर मर्दानी 3 चित्रपट नक्कीच पहावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts