Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “सरकार महिला आरक्षण विधेयकाचा राजकीय वापर करत आहे,”; प्रियंका गांधी लोकसभेमध्ये म्हणाल्या
ताज्या बातम्या

“सरकार महिला आरक्षण विधेयकाचा राजकीय वापर करत आहे,”; प्रियंका गांधी लोकसभेमध्ये म्हणाल्या

"सरकार महिला आरक्षण विधेयकाचा राजकीय वापर करत आहे,"; प्रियंका गांधी लोकसभेमध्ये म्हणाल्या

नवी दिल्ली Priyanka Gandhi : लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेवर जोरदार चर्चा सुरु आहे. यावर बोलताना काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वॉड्रा म्हणाल्या की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महिला संरक्षण आणि आरक्षणाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि यापुढंही राहील, याबद्दल कोणतीही शंका असू नये. आज या मुद्द्यावर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधाकांना याला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा : “सीमांकनात कोणत्याही राज्यासोबत भेदभाव होणार नाही, ही माझी गॅरंटी”; लोकसभेत

काय म्हणाल्या प्रियंका गांधी :

यावेळी संसदेत बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, “पंतप्रधानांच्या आजच्या वक्तव्यांमुळं असं वाटत आहे की, महिला आरक्षणाचं जनक आणि सर्वात मोठं समर्थक भाजपाच आहे. याचं श्रेय घ्यायचं नाही असा दावा त्यांनी केला असला तरी, त्यांच्या संपूर्ण भाषणाचा हाच विषय होता. 2023 मध्ये राहुल गांधींचं पत्र वाचल्यानंतर अनेक वर्षांनी, जेव्हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं अखेर 2023 मध्ये हा कायदा एकमतानं मंजूर केला, तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं आपल्या विचारधारेनुसार त्याला पूर्ण पाठिंबा दिला.”

नेहमीप्रमाणे त्यांनी फक्त अर्धेच सत्य सांगितलं :

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वॉड्रा म्हणाल्या, “आज पंतप्रधानांनी याचा उल्लेख केला, पण नेहमीप्रमाणे त्यांनी फक्त अर्धेच सत्य सांगितलं. त्यांनी सभागृहाला सांगितलं की याला विरोध होता, पण नेमका कोणी विरोध केला हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही. विरोध होता असं ते म्हणाले, पण नेमका कोणी केला हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. सत्य हे आहे की तुम्ही (भाजपा) याला विरोध केला होता. काही वर्षांनंतर, माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारनं संसदेत हा कायदा मंजूर करुन त्याची अंमलबजावणी केली.” प्रियंका गांधी म्हणाल्या, “जर हे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झालं, तर या देशातील लोकशाही संपुष्टात येईल.”

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts