• Home
  • राजकारण
  • “६ जणांचा मृत्यू, ५ मृतदेह कसे? मनात शंकेचं काहूर, अन् प्रश्नांचा आगडोंब उसळतोय”; मिटकरी
Top News

“६ जणांचा मृत्यू, ५ मृतदेह कसे? मनात शंकेचं काहूर, अन् प्रश्नांचा आगडोंब उसळतोय”; मिटकरी

Mitkari Raises Death Count Questions

Mitkari Raises Death Count Questions : अजित पवारांच्या विमान अपघातावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत 28 जानेवारीला निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनी, अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात पाच मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? टेक-ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटल पद्धतीने नोंदलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही, असंही अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले. मनात शंकेचं काहूर आणि प्रस्नांचा आगडोंब उसळत असल्याचे मिटकरी म्हणाले आहेत.

हेही वाचा –  अजितदादांच्या आवडीचे अर्थ खाते सुनेत्रा पवारांना नाहीच! कमी महत्त्वाची ‘ही’ ३ खाते सोपवली..

उपमुख्यमंत्रीसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघात व सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या लियरजेट ४५ विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? तसेच अहवालांनुसार पूर्वी अल्कोहोल-संबंधित कारणांवर शासकीय कारवाई व निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने आणि कोणत्या मेडिकल-फिटनेस, सेफ्टी क्लिअरन्सवर करण्यात आली? याबाबत सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय? असेही प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत. एकूणच अजित पवार यांचे विमान अपघात प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात असून चौकशीची मागणी केली जात आहे.

दुसरीकडे पीयूष गोयल यांनी केलेल्या विधानवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.. ते म्हणाले, पीयूष गोयल हे आमच्या पक्षाचे नाहीत त्यांनी आमच्या पक्षात ढवळाढवळ करू नये.. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होतील हे ते कसे काय ठरवतील असे मिटकरी यांनी म्हटल आहे.. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या सुनीत्रा वहिनी ठरवतील असेही मिटकरी म्हणाले.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरण यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही पक्ष एक व्हावे ही सामन्य कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं त्यांनी म्हटल आहे. तर आमच्या पक्षाचे सर्व अधिकार हे सुनित्रा वहिनी यांच्याकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts