• Home
  • राजकारण
  • नवीन पटनायक यांना मोठा धक्का, एकदम जवळच्या खासदाराने सोडली साथ
Top News

नवीन पटनायक यांना मोठा धक्का, एकदम जवळच्या खासदाराने सोडली साथ

Naveen Patnaik Political Setback

Naveen Patnaik Political Setback : ओडिसाच्या राजकारणातून (Odisa Politics) सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीजू जनता दलचे अध्यक्ष नवीन पटनायक (Naveen Patnayak) यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे वरिष्ठ वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार देबाशीष सामंतराय (Debashish Samantarai) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांची ओळख माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय अशीच होती. त्यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. त्यांनी या राजीनाम्यात पक्षावर आणि पक्षातील काही महत्त्वाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा – ‘जनतेच्या खिशावर डल्ला मारणे हा BJPचा मुख्य अजेंडा’; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

त्यांनी पत्रात लिहिल्याप्रमाणे, पक्षात आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आपण हे पाऊल उचललं असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. “बीजू जनता दलचे अध्यक्ष नवीन पटनायक यांना मी माझा राजीनामा पत्र सोपवतो. पार्टीच्या स्थापनेपासून आजपर्यंत मी सेवा, संघटन आणि समर्पण या धोरणानुसार काम केलं. भविष्यात देखील ओडिशाच्या जनतेसाठी माझा संघर्ष सुरु ठेवेन. जय जगन्नाथ” अशी त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. “आज म्हणजे 25 मे रोजी मी बीजेडीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यांनी पक्षाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांचे आभार मानले आहेत. “मला राज्यसभेवर पाठवल्याबद्दल मी आपला नेहमीच आभारी राहीन. अविभाजीत कटक जिल्ह्याच्या जनतेची सेवा आणि राष्ट्रीय स्तरावर ओडिशाचे मुद्दे उपस्थित करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो,” असं सामंतराय यांनी सांगितलं.

सध्या पक्षातद माझा अपमान सुरु

“मी नेहमीच स्वत:ला पक्षाच्या हितासाठी समर्पित केलं आहे. अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पक्षाचं काम केलं आहे. पण अलीकडे मला असं दिसू लागलय की. पक्षाच सुनियोजित पद्धतीने माझा अपमान सुरु आहे. पक्षाला माझ्या सेवांची आवश्यकता नाही. म्हणून मी जनहिताच्या दृष्टीने हा कठोर निर्णय घेतला आहे. तुम्हाला मी माझं राजीनामा पत्र स्वीकारण्याची विनंती करतो” असं देबाशीष सामंतराय यांनी म्हटलं आहे.

सामंतराय लवकरच भाजपात जाण्याची शक्यता

देबाशीष सामंतराय हे लवकरच भाजपमध्ये सहभागी होतील अशी माहिती आहे. त्यांनी राज्यसभा अध्यक्ष सीपी कृष्णन यांची भेट घेऊन राज्यसभा सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला आहे. ओदिशामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यापासूनच बीजेडीमध्ये अंतर्गत कलह सुरु असल्याच्या बातम्या येत आहेत. पण एका विद्यमान राज्यसभा खासदाराने पदाचा राजीनामा देणं हे पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts