• Home
  • देश
  • “धमक्या देणं थांबवा नाहीतर…”, इराणचा अमेरिकेला थेट इशारा, जागतिक तणाव वाढला
Top News

“धमक्या देणं थांबवा नाहीतर…”, इराणचा अमेरिकेला थेट इशारा, जागतिक तणाव वाढला

trump iran

US-Iran War | इराण (US) आणि अमेरिका (Iran) यांच्यात युद्धविरामासाठी चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे. मात्र, चर्चेच्या या दुसऱ्या फेरीबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील आपले वाटाघाटी पथक इस्लामाबादला पाठवले आहे. पण इराण यावेळी शांतता चर्चेत सहभागी होण्यास इच्छुक दिसत नाहीये. कारण इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ (Mohammad Bagher Ghalibaf) यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, धमक्यांच्या छायेत अमेरिकेसोबत कोणतीही शांतता चर्चा होऊ शकत नाही.

हेही वाचा – “भारत शांततेच्या बाजूने…”, मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

इराणने अमेरिकेला नेमका काय दिला इशारा?

मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी म्हटलं आहे की, “होर्मुझ प्रदेशात सतत नाकेबंदी लादून आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन करून डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या कल्पनेत या वाटाघाटीच्या टेबलाला शरणागतीचे टेबल बनवायचे आहे किंवा नव्याने युद्धाचा उन्माद उफाळून आणण्याचे समर्थन करायचे आहे. पण आम्हीधमक्यांच्या छायेत कोणत्याही प्रकारची चर्चा स्वीकारणार नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून आम्ही रणांगणावर आमची नवी खेळी उघड करण्यास पूर्णपणे तयार आहोत,” असा थेट इशारा गालिबाफ यांनी दिला आहे.

दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नवा इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, त्यांचे पथक इस्लामाबादला जाणार आहे. इराणने आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे सोडून दिला पाहिजे. कोणतीही अण्वस्त्रे बनवली जाणार नाहीत. तसेच इराणच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला त्यांना काही हरकत नाही, पण तेहरानने आपल्या अणुमहत्वाकांक्षा सोडून दिल्या पाहिजेत, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, जर इराणसोबत कोणताही करार झाला नाही तर त्याचे परिणाम विनाशकारी असतील. चर्चा अयशस्वी झाल्यास काय होईल बघा, मला तुमच्याशी यावर चर्चा करायची नाही. तुम्ही स्वतःच कल्पना करू शकता. ते चांगले होणार नाही, अशा गंभीर इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान, एकिकडे इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये युद्धविरामासाठी दुसऱ्यांदा चर्चा होत आहे. मात्र, आताही दोन्ही देशांच्या अटी एकमेकांना मान्य होत नसल्याने आणि दोन्ही देशांनी एकमेकांना इशारा दिल्याने पुन्हा एकदा हे युद्ध आणखी पेटणार का? असा सवाल सध्या निर्माण केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts