• Home
  • महाराष्ट्र
  • मध्य रेल्वेवर मोठा अपघात; वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना फटका, नेमकं घडलं काय?
Mumbai

मध्य रेल्वेवर मोठा अपघात; वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना फटका, नेमकं घडलं काय?

mumbai railway

Mumbai Central Railway Accident | मुंबईत रेल्वेने (Mumbai Railway) प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या संख्येत आहे. प्रत्येकजण सकाळच्या वेळी कामाला जाण्यासाठी, शाळेत, कॉलेजला जाण्यासाठी रेल्वेचाच वापर करतो. त्यामुळे मुंबईकरांची त्यांची लोकल रेल्वे ही एक लाईफलाईनच आहे. तर आता याच लाईफलाईनचा मोठा अपघात घडल्याने मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे.

हेही वाचा – मध्यपूर्वेत संघर्ष तीव्र; अमेरिकेने इराणच्या जहाजावर केला मिसाइल हल्ला, तेहराननेही दिला गंभीर इशारा

आज सकाळी गर्दीच्या वेळेस लोकलचा मोठा अपघात घडला आहे. सकाळी 8 च्या दरम्यान कळवा कारशेडकडून डोंबिवली स्थानकाजवळ येणाऱ्या एका रिकाम्या लोकलचा डबा अचानक रूळावरून घसरला. त्यामुळे सीएमएमटीकडे येणारी वाहतून मोठ्या विस्कळीत झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांना ट्रॅकवरून चालत जाण्याची वेळ आली आहे.

कळवा कारशेडहून एक लोकल गाडी कल्याणच्या दिशेने जात होती. त्यादरम्यान डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान या लोकलचा एक डबी अचानक रूळावरून खाली घसरला. सुदैवानं या लोकलमध्ये कोणीही प्रवास करत नव्हतं. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र, लोकलच्या या अपघातामुळे मुंबईकरांचे मोठे हाल झाले आहेत. रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचं वेळापत्रकच बिघडलं आहे.

लोकलच्या अपघातामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. सध्या अप मार्गावरील तीन गाड्या जागीच थांबल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोकल गाड्या आता 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाली आहे. कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली या स्थानकांवर मोठ्या संख्येने प्रवासी जमले आहेत.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून तातडीने दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, तांत्रिक पथक दाखल झाले आहेत. सध्या दुरूस्तीचे काम सुरू असून शक्य तितक्या लवकर वाहतूक सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts