• Home
  • देश
  • उत्तर कोरियाचा जगाला इशारा? दुसऱ्या दिवशीही क्षेपणास्त्र डागले, मिसाइल चाचण्यांमागचं कारण काय?
Top News

उत्तर कोरियाचा जगाला इशारा? दुसऱ्या दिवशीही क्षेपणास्त्र डागले, मिसाइल चाचण्यांमागचं कारण काय?

missile test

North Korea | एकिकडे इराण (Iran) आणि अमेरिकेतील (US) संघर्ष तीव्र होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे उत्तर कोरिया (North Korea) गेल्या दोन दिवसांपासून धोकादायक बॅलिस्टिक आणि क्लस्टर क्षेपणास्त्रांची सातत्याने चाचणी करत आहे. रविवारी (19 एप्रि) उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचण्या (Missile tests) करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आजही उत्तर कोरियाने सलग दुसऱ्या दिवशी क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – मध्य रेल्वेवर मोठा अपघात; वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना फटका, नेमकं घडलं काय?

उत्तर कोरियाने दुसऱ्या दिवशीही क्षेपणास्त्र डागले

उत्तर कोरियाने सोमवारी क्लस्टर बॉम्ब वॉरहेड्स असलेली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. किम जोंग उनच्या प्रशासनाने दावा केला आहे की, या महिन्यात क्लस्टर बॉम्ब वॉरहेड्स असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याची ही दुसरी वेळ आहे.

उत्तर कोरियाची सरकारी वृत्तसंस्था कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी (KCNA) ने वृत्त दिले आहे की, रविवारी उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावरून अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली जी दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेने शोधून काढली आहेत.

केसीएनएच्या वृत्तानुसार, किम यांनी क्लस्टर बॉम्ब आणि फ्रॅगमेंटेशन माइन वॉरहेड्स वाहून नेणाऱ्या पाच सुधारित जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ह्वासोंग-11आरए (Hwasong-11Ra) बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणाचे निरीक्षण केले. या क्षेपणास्त्रांनी एका बेटावरील लक्ष्यावर यशस्वी मारा केला आहे. तसेच “लष्करी कारवायांसाठी उच्च-घनतेच्या हल्ल्याची क्षमता वाढवणे महत्त्वाचे आहे”, असं म्हणच किम यांनी या प्रक्षेपणाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या एका प्रक्षेपणात, उत्तर कोरियाने क्लस्टर बॉम्ब वॉरहेड्स असलेल्या ह्वासोंग-11 जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही क्षेपणास्त्रे “6.5-7 हेक्टर (16 ते 17.2 एकर) क्षेत्राची राखरांगोळी करू शकतात.” उत्तर कोरियाने यापूर्वीही क्लस्टर बॉम्ब वॉरहेड्सची चाचणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts