• Home
  • देश
  • मध्यपूर्वेत संघर्ष तीव्र; अमेरिकेने इराणच्या जहाजावर केला मिसाइल हल्ला, तेहराननेही दिला गंभीर इशारा
Top News

मध्यपूर्वेत संघर्ष तीव्र; अमेरिकेने इराणच्या जहाजावर केला मिसाइल हल्ला, तेहराननेही दिला गंभीर इशारा

iran us

US-Iran War | अमेरिका (US) आणि इराण (Iran) यांच्यातील संघर्ष (War) काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अमेरिकेने मलेशियाहून इराणकडे जाणाऱ्या एका इराणी मालवाहू जहाजावर (Cargo Ship) क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. अमेरिकेच्या नौदलाने त्या जहाजाला ओमानच्या आखाताजवळ थांबण्याचा आदेश दिला होता. मात्र, इराणी जहाजाने या आदेशाचे उल्लंघन केले. त्यानंतर अमेरिकेच्या युद्धनौकेने इराणी जहाजाच्या इंजिन रूममध्ये एक क्षेपणास्त्र डागले. यामुळे इराणी जहाज थांबले, जे सध्या अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे या हल्ल्याबाबतची माहिती दिली आहे.

हेही वाचा – HR निदाचा धडकी भरवणारा प्लान; बुरखा घालायला लावलं अन्…, नाशिकच्या TCS कंपनीतील कर्मचाऱ्यांचा मोठा खुलासा

अमेरिकेने इराणच्या मालवाहू जहाजावर हल्ला केल्यानंतर या हल्ल्याला इराणने देखील जोरदोर प्रत्युत्तर दिले आहे. इराणने अमेरिकेच्या अनेक युद्धनौकांवर हल्ला केला आहे. इराणने ड्रोनद्वारे अमेरिकेच्या युद्धनौकांना लक्ष्य केल्याचे म्हटलं आहे. अमेरिकेच्या नौदलाच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने हे पाऊल उचलले आहे. अमेरिकेच्या नौदलाने एका इराणी मालवाहू जहाजावर हल्ला केला त्यानंतर इराणने ड्रोन हल्ल्याचा दावा केला आहे.

अमेरिकेने केलेल्या हल्ल्याबाबत इराणच्या उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे की, या हल्ल्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील. एकतर सर्वांसाठी मुक्त तेल बाजारपेठ असेल नाहीतर सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे आता जर अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नाकेबंदी उठवली नाही, तर इराण टोकाचे पाऊल उचलू शकतो.

दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील संघर्ष थांबवण्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत. असं म्हटलं जात आहे की, इस्लामाबादमध्ये होणाऱ्या चर्चेचा मसुदा काही अटींसह अंतिम करण्यात आला आहे. यामध्ये अमेरिकेची इच्छा आहे की इराणने पुढील वीस वर्षांसाठी युरेनियम संवर्धन थांबवावे. तर इराणने पाच वर्षांच्या स्थगितीला सहमती दर्शवली आहे. तसेच अमेरिकेची मागणी आहे की इराणने सर्व संवर्धित युरेनियमचा ताबा घ्यावा. त्या बदल्यात इराण 20 अब्ज डॉलर्सची मालमत्ता गोठवण्याची आणि आर्थिक निर्बंध उठवण्याची मागणी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts