Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • पॅसिफिक मॉलमध्ये भीषण अग्नितांडव, बचावकार्यासाठी अग्निशमन दलाची धावपळ, थरारक व्हिडीओ व्हायरल
Top News

पॅसिफिक मॉलमध्ये भीषण अग्नितांडव, बचावकार्यासाठी अग्निशमन दलाची धावपळ, थरारक व्हिडीओ व्हायरल

Ghaziabad Pacific Mall Fire | उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये (Ghaziabad) मोठी दुर्घटना घडली आहे. गाझियाबादमधील प्रसिद्ध पॅसिफिक मॉलला भीषण आग (Pacific Mall Fire) लागल्याची घटना घडली आहे. मॉलला लागलेली ही आग एवढी भीषण होती की अग्निशमन दल देखील हादरून गेले होते. सध्या या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा –  “आधी काम होऊ द्या मग पैसे द्या…”, मोटेगावकर करायचा लाखोंचे व्यवहार, NEET प्रकरणात RCC इन्स्टिट्यूटचा पर्दाफाश

गाझियाबादच्या प्रसिद्ध पॅसिफिक मॉलमध्ये भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या प्रसिद्ध पॅसिफिक मॉलमध्ये भीषण आग लागली आहे. आज (21 मे) सकाळी पॅसिफिक मॉलमध्ये असलेल्या सिनेमाच्या प्रोजेक्टर रूममध्ये भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, सहाहून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम करत आहेत. लिंक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौशांबी आनंद विहार सीमेवर असलेल्या पॅसिफिक मॉलमध्ये ही आग लागली.

या घटनेबाबतची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाझियाबाद साहिबाबाद येथील पॅसिफिक मॉलमधील चित्रपटगृहात आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी रवाना झाल्या. घटनास्थळी पोहोचल्यावर असं दिसून आलं की, चित्रपटगृहाच्या प्रोजेक्टर रूम आणि चित्रपटगृहात भीषण आग लागली होती, ज्यामुळे संपूर्ण मॉलमध्ये धूर पसरला होता. तर सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळलेले नाहीये.

मॉलमध्ये लागलेली ही आग ही एवढी भीषण आहे की अग्निशमन दलाच्या पथकाने होज पाईपच्या आठ रांगा टाकून आणि मॉलच्या अग्निशमन प्रणालीचा वापर करून आग विझवण्यास सुरुवात केली आहे. आगीची तीव्रता लक्षात घेता कोतवाली आणि साहिबाबाद अग्निशमन केंद्रातून त्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह इतर वाहने बोलावण्यात आली आहेत. अग्निशमन दलाच्या पथकाने सुमारे एक तास अथक परिश्रम करत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. तसेच या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts