Breaking News :
  • Home
  • देश
  • मला लोकांच्या प्रतिक्रियांचा फरक पडत नाही; गन सेलिब्रेशनवर साहीबजादाची पहिली प्रतिक्रिया
क्रीडा

मला लोकांच्या प्रतिक्रियांचा फरक पडत नाही; गन सेलिब्रेशनवर साहीबजादाची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्राला पावसाने झोडपले राज्यात बिकट परिस्थिती 4

सध्या क्रिकेट जगतात आशिया कप 2025 स्पर्धेची जोरदार चर्चा असून रविवारी भारताने पाकिस्तानचा सुपर-4 मध्ये पुन्हा दारूण पराभव केला. रविवारचा भारतपाकिस्तान सामना अनेक कारणांनी गाजला. यात अनेक वादही झाले. पण हा सामना चर्चेचा विषय बनला ते पाकिस्तानचे खेळाडू आणि त्यांच्या चित्रविचित्र कृती यामुळे. सुपर-4 सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. पण याच सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू, साहिबजादा फरहाने अर्धशतकाचा आनंद व्यक्त करताना केलेल्या “गन सेलिब्रेशन” ची सर्वत्र चर्चा झाली. खरं तर, पाकिस्तानने प्रथम लंदाजी केली, पण त्यावेळी अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, फरहानने त्याची बॅट बंदुकीसारखी धरून त्याचं यश साजरं केलं. त्याच्या या कृतीवरून त्याच्यावर बरीच टीका झाली, अनेकांनी त्याला ट्रोलही केलं. मात्र आता साहिबजादा फरहान याने त्याच्या गन सेलिब्रेशनवर प्रतिक्रिया दिली आहे.

साहिबजादा फरहान म्हणणं काय?

अर्धशतक झाल्याच्या आनंदात केलेल्या गन सेलिब्रेशनबद्दल साहिबाजादा पहिल्यांदाच बोलला.तो म्हणाला,”अर्धशतक झाल्यावर माझ्या मनात आलं, म्हणून मी सेलिब्रेशन केलं. त्यावर लोकांची काय प्रतिक्रिया होती, ते काय बोलले यामुळे मला काहीच फरक पडत नाही”, असंही तो म्हणाला. यापुढे तो म्हणाला,”माझी टीम आक्रमकपणे खेळावी, अशीच इच्छा” असल्याचेही त्याने बोलून दाखवलं.

गन सेलिब्रेशनचं कारण काय?

गन सेलिब्रेशनबद्दल बोलताना साहिबाजादा म्हणाला कि,”ते सेलिब्रेशन फक्त त्या क्षणात हरवून गेल्यामुळे झालं. खरंतर 50 धावा, अर्धशतक केल्यावर मी असं सेलिब्रेशन करत नाही. पण तेव्हा माझ्या मनात अचानक विचार आला, की आज सेलिब्रेशन करावं. मग मी तसंच केलं. त्यावर लोकांची काय प्रतिक्रिया असेल याचा मी विचार केला नाही. लोकांच्या प्रतिक्रियेने, त्यांच्या बोलण्याने मला फरक पडत नाही”, असेही साहिबजादाने सांगितले.

रविवारी झालेल्या सुपर -4 सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी पाकिस्तानला मिळाल्यानंतर साहिबजादा फरहानने पाकिस्तानला जलद सुरुवात करून देत 58 धावांच्या खेळी खेळली. त्याच्या या खेळीमुळे पाकिस्तानने 171 धावां मोठं टार्गेट रचलं. पण, भारतातर्फे अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारताला पाकिस्तानवर सहज विजय मिळवता आला. दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात साहिबजादा फरहान हा एकमेव पाकिस्तानी खेळाडू नव्हता, ज्याला त्याच्या हावभावांसाठी ट्रोल केले गेले. लढाऊ विमान नष्ट करण्याची ॲक्शन करणारा हारिस रौफ याच्यावरही बरीच टीका झाली. त्याच्यासमोरच कोहलीच्या नावाचा जयघोष करत चाहत्यांनी त्याला त्याची जागा दाखवून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts