Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची कॉलेजची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल; कमेंटचा वर्षाव
मनोरंजन

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची कॉलेजची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल; कमेंटचा वर्षाव

Shah Rukh Khan college marksheet viral : आपण लहान असताना आपला अभ्यास, प्रगती दर्शवणारे मार्कशीट आणि त्यावर विविध विषयात असलेले मार्क तुम्हाला अजूनही आठवत असतील. पण तेच मार्कशीट अनेक वर्षांनी तुमच्या हातात पडल्यानंतर किती गंमत वाटते ना ? असंच आता एका बॉलिवूड अभिनेत्याची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या मार्कशिटमुळे आता अभिनेता खरंच किंग असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तुम्हाला माहिती आहे का कोण आहे हा अभिनेता ? जाणून घेऊया या लेखात.

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या कॉलेजच्या मार्कशीटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याची ही कॉलेज मधील मार्कशीट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या मार्कशीट मध्ये त्याला किती मार्क्स मिळालेत हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

हे ही वाचा : अभिनेते रितेश देशमुख करणार बिगबॉस मराठी सिझन 6 चे सूत्रसंचालन; बिगबॉस हिंदीच्या मंचावर भाईजानने केली घोषणा

1985 ते 1988 दरम्यान अभिनेता शाहरुख खानने हंसराज कॉलेज मध्ये अर्थशास्त्र या विभागात पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले होते. तेथील हि व्हायरल मार्कशीट आहे. या मार्कशीट मध्ये दिलेल्यानुसार अभिनेता शाहरुख खान 92 गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता. त्याला इंग्रजी मध्ये 51 गुण भौतिकशास्त्रात आणि गणितात प्रत्येकी 78 गुण मिळाले होते. सोशल मीडियावर शाहरुख खानच्या या मार्कशिटचे कौतुक होत असून कॉलेज ते अभिनेता अशा त्याच्या प्रवासावर कॉमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सध्या किंग खान त्यांचा आगामी चित्रपट किंगची तयारी करत आहे. या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, अभिनेता अभिषे बच्चन दिसणार आहे. या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली असून लवकरच हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts