Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध च्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पंड्या, गिल कमबॅक
Top News

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध च्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पंड्या, गिल कमबॅक

Indian Squad Announced for T20 Series

Indian team selection for T20 series : एकदिवसीय मालिका संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. ज्यासाठी अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली आहे. पाच सागन्यांची टी-20 गालिका 9 ते 19 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. शुबगन गिल टीग इंडियाचा उपकर्णधार असणार आहे.

रायपूरमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सागन्यादरम्यान बीसीसीआयने पाच सागन्यांच्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. सर्वात उल्लेखनीय म्हणजे शुभमन गिल आणि हार्दिक पांडया यांनी दुखापतीनंतर संघात पुनरागमन केले आहे. गिलला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, परंतु मालिकेतील त्याचा सहभाग त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. पण, या मालिकेसाठी संघातून रिंकू सिंगला वगळण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा – आफ्रिकेविरूद्ध विराटचं सलग दुसरं शतक, नवा विक्रम नोंदवला..

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर या फलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे.

शुबमन गिलच्या खांद्यावर उपकर्णधार पदाची धुरा

शुबमन गिल टी-२० मालिकेत संधी मिळाली असून त्याच्या खांद्यावर पुन्हा एकदा उपकर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे शुबमनची एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही. त्यामुळे आता कुणाला संधी मिळते? याकडे सर्वांचं लक्ष होतं.

हार्दिक पांड्या कमबॅक

अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पंड्या याचं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून टी 20i टीममध्ये कमबॅक होणार असल्याचं निश्चित समजलं जात होत. हार्दिकला टी 20 आशिया कप स्पर्धेत दुखापत झाली होती. तेव्हापासून हार्दिक टीममधून बाहेर होता. हार्दिकचं कमबॅक होणार का ? याकडे क्रिकेटप्रेमींचं लाक्ष लागलं होतं. मात्र, आता निवड झाल्यांने टीम इंडियाला बॅटिंग आणि बॉलिंगला बुस्टर मिळाला आहे.

ऋतुराज गायकवाडची संधी हुकली..

हार्दिक व्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल या दोघांचं कमबॅक झालं. मात्र, ऋतुराज गेल्या अनेक महिन्यांपासून टी 20 संघामधून बाहेर आहे. ऋतुराजने विंडीज विरुद्ध 2024 साली अखेरची टी -20 मालिका खेळली होती. तसेच ऋतुराजने दक्षिण आफ्रेकिविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून कमबॅक केलं आहे. त्यामुळे निवड समिती ऋतुराजवर विश्वास दाखवणार का? आणि त्याला टी -20 संघातही संधी मिळणार, याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या मात्र ही निवड यादी पाहिल्यानंतर त्यांची निराशा झाली असणार एवढं मात्र नक्की.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts