Thackeray attack on BJP Shinde group : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी सध्या रणधुमाळी सुरू आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष प्रचाराचे रान उठवत आहेत. काल भाजप आणि शिंदे सेनेने प्रचाराचे नारळ फोडलं. त्यानंतर आज ठाकरे सेना आणि मनसेने मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा जाहीर केलाय. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही साधी कामे केली आहेत. ती होर्डिंगवर दाखवत आहोत. कोस्टल रोडचं काम केलं. मध्य वैतरणा केलंय. मोदींनी कैलास पर्वत तयार केला आहे. मोदींनी गंगेतून पाणी आणलं. मिध्यांनी अरबी समुद्र बांधला, अशी टीका त्यांनी केली. महायुतीच्या निवडून आलेल्या बिनविरोध नगरसेवकांवर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, कोर्टात जाऊन काय होणार आहे. थेट निवडणुका रद्द करा, असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी आयोगाला दिलाय.
हेही वाचा – ‘आम्हाला दमात आणि हलक्यात घेऊ नका’; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना कडक इशारा
कोर्टात जाऊन काय होणार आहे. विश्वास ठेवायचा तरी कुणावर. निवडणूक आयोगावर दम असेल तर त्यांनी निवडणूक रद्द करावी. आरओ होते त्यांचे फोन रेकॉर्ड काढा. की तेही रेकॉर्ड सीसीटीव्ही फुटेज सारखं डीलिट केलं का?. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत पहिल्यांदाच एकत्र येऊन निवडणुका लढत आहेत. आज शिवसेना भवनात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी वचननामा जाहीर केला. त्यानंतर ठाकरे बंधुनी भाजपावर जोरदार टीकास्त्र डागलं.
शिवशक्तीचा वचननामा म्हणजे,
मराठी माणसाच्या, मुंबईकरांच्या भल्याचा विचार!हाच विचार घेऊन वचननाम्याच्या माध्यमातून ‘ठाकरेंनी’ मराठी माणसाला पुन्हा एकदा आज शब्द दिलाय, आम्ही पुन्हा करून दाखवणारच!
आज शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण… pic.twitter.com/jds5wdIcmw
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 4, 2026
कोरोना काळात एक पुस्तिका तयार केली होती. ती आयोगाने रिजेक्ट केली. आता मी बेधडक वाटप करणार. निवडणूक आयोगाच्या परवानगीने आम्ही कामं केलं नव्हतं. कोरोनाचं काम स्वत केलं. आमच्या कामाची तारीफ जगाने केली, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे दिसले. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, राहुल नार्वेकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर फक्त देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेच नाही तर चक्क नरेंद्र मोदीही होते. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच अदानीवरही टीका करताना उद्धव ठाकरे दिसले. महिलांना कामही देणार आणि त्यांनी दीड हजार रुपयही देणार. मनमोहन सिंग यांनी मुंबईत आर्थिक केंद्र केलं. त्यांचं मुंबईवर प्रेम होतं, सांगताना उद्धव ठाकरे दिसले.












