Vijay Wadettiwar’s Reaction On Farmer Suicides | गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकरी (Farmer) मोठ्या प्रमाणात आत्महत्या (Suicide) करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात आता धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे सध्या राज्यात रोज तीन शेतकरी आत्महत्या (Framer Suicides) करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अख्खा महाराष्ट्र (Maharashtra) हादरून गेला आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या या वाढत्या आत्महत्यांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तर याबाबत आज विधानसभेतही चर्चा झाली. या चर्चेदरम्यान काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आपली भूमिका मांडली. पण, ही भूमिका मांडत असताना वडेट्टीवारांची जीभ घसरली ज्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – शरद पवार खासदार होणार! काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेसोबत बोलणी सुरू, सुप्रिया सुळेंनी फिल्डिंग लावली?
विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली
सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणावर भाष्य करताना विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली. ते म्हणाले की, “काय भिकारचोटपणा सुरू केला आहे. लोकं एकीकडे आत्महत्या करतात तर दुसरीकडे 5 ट्रिलियन संदर्भात बोललं जातंय.”
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर काय म्हणाले वडेट्टीवार?
“14 जिल्ह्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आत्तापर्यंत राज्यात 21 हजार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यातील फक्त 10 हजार शेतकऱ्यांना शासनानं मदत केलीये”, असं वडेट्टीवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, या राज्यात महापुरूषांच्या आदेशाचं पालन कुठे केलं जात आहे? पदोपदी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान केला जात आहे. महाराजांचा पुतळा उभा केला जातो अन् तो पुतळा अवघ्या 7 महिन्यातच कोसळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं काय झालं? असा सवालही वडेट्टीवारांनी उपस्थित केला. तसेच मागील राज्यपालांचं भाषण आणि आत्ताचं भाषण एकच असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करत आहोत, असंही ते म्हणाले.












