Sunetra Pawar | राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान अपघातात (Plane Crash) निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी हाती घेतला. तसेच सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवारांचे दौरे, सभा आणि बैठका यांना सुरूवात झाली आहे. यादरम्यान आता राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – दापोलीतील हर्णे बंदराला सागरी रो-रो सेवेचा थांबा मिळावा; राज्यमंत्री योगेश कदम यांची मागणी
20 पेक्षा जास्त आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20 हून अधिक आमदारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये सर्व आमदारांनी DGCA च्या अहवालाबाबत शंका उपस्थित केली. अजित पवारांचा अपघात झाल्यानंतर महिन्याभराने DGCA चा अहवाल समोर आला. तर या अहवालातील त्रुटी दाखवत अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक सवाल आमदारांनी उपस्थित केले.
या भेटीदरम्यान सर्व आमदारांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित करत, आपण सर्वांनी मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊया अशी विनंती सुनेत्रा पवारांकडे केली. यावर सुनेत्रा पवारांनीही फडणवीसांना भेटण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, काल आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघात प्रकरणी आणखी एक पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर करत संशय व्यक्त केले आहेत. रोहित पवारांनी पुरावे सादर करत म्हटलं की, अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्या बॉक्सवर रामचंद्र नावाचे डिरेक्टर आहेज जे 2023 ला असिस्टंट डायरेक्टर होते त्यांनी सही केली आहे. ते तो ब्लॅक बॉक्स ओके आहे असं म्हणाले आहेत. त्या ब्लॅक बॉक्सवर फक्त राख बसली आहे. ते डॅमेज झालेलं नाही. राख बसली म्हणून ब्लॅक बॉक्स डॅमेज झाला असं जर म्हणत असतील तर ही गोष्ट हास्यास्पद आहे. ब्लॅक बॉक्सच्या आत एक चीप असते. तो फोटो रिपोर्टमध्ये यायला हवा होता मात्र दुर्दैवानं तो आला नाही. तसेच अजितदादांच्या विमानातील सापडलेला ब्लॅक बॉक्स डॅमेज झालेला नाही, असा दावा राहित पवार यांनी केला आहे.












