Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • ‘Silent Luxury’ ट्रेंड नेमका काय? कशी असते ही स्टाइल, जाणून घ्या एका क्लिकवर
लाईफस्टाईल

‘Silent Luxury’ ट्रेंड नेमका काय? कशी असते ही स्टाइल, जाणून घ्या एका क्लिकवर

Gen Z fashion Trend

Gen Z New Fashion Trend: आजची Gen-Z पिढी फॅशनकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते. महागडे ब्रँड्स दाखवण्यापेक्षा ही पिढी साधेपणा, आराम आणि स्वतःची ओळख जपणाऱ्या स्टाइलला अधिक महत्त्व देते. सध्या त्यांच्यात एक नवा फॅशन ट्रेंड जोरात चर्चेत आहे. चला जाणून घेऊया, नेमका हा ट्रेंड काय आहे.

आजची Gen-Z पिढी जुन्या पिढीपेक्षा अनेक बाबतीत वेगळी आहे. खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते नातेसंबंध, काम करण्याची पद्धत आणि फॅशनपर्यंत त्यांच्या विचारांमध्ये मोठा बदल दिसतो. ही पिढी स्वतःच्या आवडीप्रमाणे आरामदायी आणि साधी लाइफस्टाइल स्वीकारण्याकडे अधिक झुकते.

हेही वाचा: भारतामधील टॉप 5 जीन्स होलसेल मार्केट; बजेटमध्ये मिळवा स्टायलिश पॅंट्स

Silent Luxury ट्रेंड नेमका काय?

Gen-Z मध्ये सध्या ‘Silent Luxury’ हा फॅशन ट्रेंड खूप लोकप्रिय झाला आहे. याला क्वाइट लक्झरी’ (Quiet Luxury) किंवा स्टेल्थ वेल्थ (Stealth Wealth) असेही म्हटले जाते. हा ट्रेंड दिखाव्यापेक्षा साधेपणा आणि क्लासवर आधारित आहे. यात मोठे लोगो, चमकदार डिझाइन्स किंवा भडक कपड्यांऐवजी साधे, स्वच्छ आणि उच्च दर्जाचे कपडे निवडले जातात.

फॅशनमध्ये बदलती विचारसरणी

पूर्वी फॅशन म्हणजे महागडे ब्रँड्स आणि आकर्षक लुक असे मानले जात होते. मात्र आता Gen-Z साठी फॅशन म्हणजे स्वतःला कम्फर्टेबल वाटणे आणि नैसर्गिक दिसणे. कपड्यांमधून स्वतःची ओळख आणि व्यक्तिमत्त्व दाखवणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते.

साधेपणातच खरी स्टाईल

‘Silent Luxury’ फॉलो करणारे लोक साधे पण आकर्षक कपडे घालतात. यात न्यूट्रल रंग जसे की पांढरा, काळा, ग्रे, बेज यांना प्राधान्य दिले जाते. कपड्यांचा फिट, फॅब्रिक आणि फिनिश यावर अधिक लक्ष दिले जाते.

ब्रँड नाही, क्वालिटी महत्त्वाची

या ट्रेंडमध्ये कपड्यावर कोणत्या ब्रँडचा लोगो आहे यापेक्षा त्याची गुणवत्ता महत्वाची असते. टिकाऊ, आरामदायक आणि चांगल्या मटेरियलचे कपडे निवडले जातात. कमी कपडे असले तरी ते दीर्घकाळ वापरता येतील, यावर भर असतो.

कोणते फॅब्रिक आणि स्टाईल?

लिनन, कॉटन, वूल सिल्क यांसारख्या प्रिमियम फॅब्रिक्सना या ट्रेंडमध्ये जास्त पसंती आहे. डिझाइन साधे असते, पण लूक एलिगंट असतो. हे कपडे कोणत्याही प्रसंगी वापरता येतात आणि लवकर आउटडेटेड होत नाहीत.

 

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts