Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • इन्स्टाग्राम ओळख महागात! मुस्लीम मुलाने नाव बदलून तरुणीला आर्थिक व शारीरिक लुटले
Top News

इन्स्टाग्राम ओळख महागात! मुस्लीम मुलाने नाव बदलून तरुणीला आर्थिक व शारीरिक लुटले

Identity Change Fraud Exploitation Case

Identity Change Fraud Exploitation Case : आजकालच्या तरुणाईला जणू सोशल मीडियाचं (Social media) व्यसनच लागलंय. याच सोशल मीडियावर त्यांचे स्टेटस शेअर होतात. सुख, दु:ख व्यक्त होतात, एकमेकांना शुभेच्छा देतात, एकमेकांशी दोस्ती करतात, सोशल मीडियावर एकमेकांशी दुश्मनीही करतात, सोशल मीडियावरील ओळखीतून सुरूवातीला चॅटिंगचं प्रकरण (Fraud by Concealing Identity) कधी डेटिंगपर्यंत पोहोचतं हे कळंतही नाही. मात्र हा प्रकार किती धोकादायक ठरु शकतो, एखाद्याचं कसं आयुष्य उद्ध्वस्त (Fraud Against a Young Woman) होऊ शकतं, हे या धक्कादायक घटनेवरून (Shocking Incident) लक्षात येईल.

सोशल मीडियावरील ‘फेक’ प्रेमाचा भयानक शेवट झाला, पालघरमध्ये महिलेची लाखोंची फसवणूक आणि शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीला पुण्यातून बेड्या ठोकण्यात आल्या. पण या प्रकरणाची सुरूवात आणि शेवट कसा झाला? हेही सविस्तर पाहूयात.. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून, प्रेमाचे नाटक रचत एका महिलेची आर्थिक आणि शारीरिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये उघडकीस आला आहे. बीड जिल्ह्यातील एका तरुणाने हिंदू नाव धारण करून इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडले, पीडितेशी लग्न केल्याचा बनाव रचला आणि सुमारे अडीच लाख रुपये उकळले. इतकेच नव्हे तर, आरोपीच्या पत्नीनेही या गुन्ह्यात सामील होऊन पीडितेकडे खंडणी मागितल्याने खळबळ माजली आहे. केळवे सागरी पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीला पुण्यातील वाघोली परिसरातून अटक केली आहे.

हेही – दिल्ली पुन्हा हादरली! आधी धावत्या कारमध्ये महिलेवर केला बलात्कार अन् नंतर…, धक्कादायक घटनेनं खळबळ

पीडित तरुणीचे आर्थिक व शारीरिक शोषण

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी राजू सिकंदर शेख याने इन्स्टाग्रामवर ‘अजय म्हस्के’ या नावाने एक बनावट प्रोफाईल तयार केले होते. या अकाऊंटच्या माध्यमातून त्याने पालघर जिल्ह्यातील एका २९ वर्षीय महिलेशी संपर्क साधला. स्वतःची खरी ओळख लपवून त्याने पीडितेशी जवळीक वाढवली. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून विश्वासात घेतले. पीडितेचा पूर्ण विश्वास संपादन केल्यानंतर, आरोपीने तिला एका मंदिरात नेले. तिथे हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न केल्याचा बनाव रचला. लग्नानंतर गेल्या सहा महिन्यांपासून तो पीडितेसोबत पती-पत्नीसारखा राहत होता. या काळात त्याने पीडितेचे शारीरिक शोषण केले. लग्नाच्या नावाखाली आणि विविध घरगुती अडचणींचे कारण सांगून त्याने पीडितेकडून वेळोवेळी सुमारे २ लाख ४५ हजार रुपये उकळले.

पत्नीनेही फसवणुकीत आरोपीला दिली साथ

या कथेला तेव्हा कलाटणी मिळाली जेव्हा आरोपीची खरी ओळख समोर आली. पीडितेने जेव्हा आरोपीकडे पैशांचा जाब विचारला, तेव्हा त्याने तिला धमकावण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी राजू शेख याच्या पत्नीनेही या फसवणुकीत त्याला साथ दिली. आरोपीच्या पत्नीने पीडितेचे काही खासगी अश्लील फोटो आणि व्हिडिओ मिळवले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत तिने पीडितेकडे २ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा

सततच्या मानसिक आणि आर्थिक छळाला कंटाळून पीडितेने अखेर केळवे सागरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपली आपबिती सांगितली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल केला. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी पुण्यातील वाघोली परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पालघर पोलिसांनी तातडीने एक पथक पुण्याला रवाना केले आणि सापळा रचून राजू सिकंदर शेख याला अटक केली.

पोलिसांनी आरोपीला पालघर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात फसवणूक, बलात्कार, खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या पत्नीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts