Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • धक्कादायक! नाशिकमध्ये शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला, परिसरात तणाव, नेमंक घडलं काय?
Top News

धक्कादायक! नाशिकमध्ये शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला, परिसरात तणाव, नेमंक घडलं काय?

Nashik Crime | नाशिकमध्ये (Nashik) एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकमधील सिडको परिसरात शिंदे गटाच्या (Shinde Group) एका नेत्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असून संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला केल्यानंतर संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे.

हेही वाचा –  निशांत कुमारांची उपमुख्यमंत्रीपदी निवड का झाली नाही? तेज प्रताप यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले…

शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला?

काल (14 एप्रिल) रात्री सिडको परिसरातील दत्त चौकात शिंदे गटाचे विभागप्रमुख सुयश पाटील (Suyash Patil) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुयश पाटील हे आपल्या कार्यालयाजवळ असताना अचानक काही अज्ञात टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार कोयत्याने त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात सुयश पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या कार्यालयाची देखील तोडफोड केली आणि नंतर तिथून त्यांनी पळ काढला.

अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात सुयश पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं नाशिकमधील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी सांगितलं हल्ल्याचं कारण

या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी या हल्ल्याचे काही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित हल्लेखोर स्पष्टपणे दिसत असून त्यांची ओळख पटली आहे. सध्या पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत, यासाठी पोलिसांनी आपली पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली आहेत. तर हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, सुयश पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे कसलाही अणुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी संबंधित परिसरात कडक बंदोबस्त केला आहे. तसेच या घटनेनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts