simple wedding vs lavish wedding : निवृत्ती काशिनाथ देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज नेहमीच आपल्या वक्तव्याने आणि किर्तनाने महाराष्ट्रभर चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.. मात्र आज इंदुरीकर महाराज चर्चेत येण्याचं कारण जरा काही वेगळंच आहे. सध्या ते त्यांच्या मुलीच्या राजेशाही लग्नामुळे चर्चेत आले आहेत. आपल्या किर्तनातून जनतेला साधेपणाचा उपदेश देणारे इंदुरीकर महाराज आज आपल्याच मुलीच्या मायेत अक्षरषा आंधळे आणि बहिरे झाल्याचे दिसून येत आहेत.
राजकीय नेते, संत-महंतांची लग्नसोहळ्याला हजेरी
अरवी समाजाला साधं लग्न केलं तरी मुलं होतात असं म्हणणाऱ्या, इंदोरीकर महाराजांनी मात्र आपल्या मुलीच्या राजेशाही विवाहाला कोणतीच कमी ठेवली नाही. या शाही विवाहाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. दोघेही या विवाहसोहळ्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राजकीय नेते, संत-महंत यांची मोठ्या प्रमाणात हजेरी विवाहसोहळ्यात असेल. भव्य साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर इंदोरीकर महाराज चर्चेत आले होते. त्यानंतर लग्नापेक्षाही मोठी पैशांची उधळपट्टी महाराजांकडून केली जात आहे.
इंदोरीकर महाराजांनी लेकीसाठी करूनच दाखवलं
काही दिवसांपूर्वी शाही पद्धतीने पार पडलेल्या साखरपुड्यामुळे इंदोरीकर महाराज त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्याचवेळी इंदोरीकर महाराज यांनी सांगितलं होतं. साखरपुड्यापेक्षा पट्टीने लग्न कसे चांगले करतो पाहा.. आता इंदोरीकर महाराजांनी जे बोलले तेच करून दाखवल्याचे बोलले जात आहे.
“बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या उक्तीला इंदुरीकर जागले नाहीत
शंभर एकारात भव्य लग्न सोहळा काही वेळातच पार पडणार आहे. त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यावरुनही त्यांच्यावर चांगलीच टीका करण्यात आली होती.. मात्र, या टीकेला न जुमानता इंदोरीकर महाराजांनी लेकीचे लग्न राजेशाही पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलाय. इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा संगमनेर येथील ‘वसंत लॉन्स’ येथे मोठ्या थाटामाटात पार पडत आहे. त्यांच्या या राजेशाही थाटामुळे मात्र “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या उक्तीला इंदुरीकर महाराज खरे उतरु शकले नाहीत, असं दिसून आलं.
उपदेश एक, आचरण दुसरं.. महाराजांना पुन्हा एकदा धरलं धारेवर
उपदेश एक, आचरण दुसरं? म्हणत नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा इंदोरीकर महाराजांना धारेवर धरले. साखरपुड्यापेक्षा लग्न अधिक भव्य करण्याचे महाराजांनी अगोदरच जाहीर केले होते. आता या शाही विवाहसोहळ्यामुळे महाराजांना पुन्हा एकादा लोक खडेबोल सुनावताना दिसत आहेत. लग्न साधी करा असे कायमच किर्तनात इंदोरीकर महाराज सांगताना दिसतात.
मुलीच्या लग्नात जनतेला दिलेल्या उपदेशाचा विसर
‘लग्न साध्या पद्धतीने केली तरी पोरं होतात’, म्हणणाऱ्या इंदोरीकर महाराजांना त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांनी जनतेला दिलेल्या उपदेशाचा विसर पडल्याचं पाहायला मिळतंय. प्रत्येक गोष्टीचे शाही नियोजन या विवाहसोहळ्यात करण्यात आले. डेकोरेशन, पाहुण्यांची खास व्यवस्था आणि खास जेवणाचं नियोजन या विवाहसोहळ्यात करण्यात आलंय. मात्र, इंदोरीकर महाराज लेकीच्या लग्नात पैशांची ज्या पद्धतीनं उधळण करत आहेत. ते लोकांच्या पचणी पडत नाहीये.












