Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • रितेश भाऊचा ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर राडा करतोय!
Top News

रितेश भाऊचा ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर राडा करतोय!

Raja Shivaji Box Office Collection

Raja Shivaji Box Office Collection : १ मे महाराष्ट्र दिनाला मुहूर्त साधत रितेशने हा सिनेमा मैदानात उतरवला. पहिल्याच दिवशी सिनेमाने ११.३५ कोटींची रेकोर्डब्रेक ओपनिंग घेतली. पहिल्या आठवड्यातच सिनेमाने ५७ कोटींचा टप्पा पार केला आणि ९ व्या दिवसापर्यंत म्हणजे आज ही कमाई ६३ ते ६५ कोटींच्या घरात गेली आहे. विषय असा आहे की, फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही, तर आख्ख्या देशात मराठी लोकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलंय.

रितेशच्या ‘वेड’ सिनेमाने ७५ कोटींची कमाई केली होती, पण ‘राजा शिवाजी’ चित्रपट तर अवघ्या ९ दिवसांत त्या आकड्याला भिडलाय. म्हणजे रितेशच्या करिअरमधला हा आजवरचा सर्वात मोठा ‘लय भारी’ हिट ठरलाय. आता काही लोकं याची तुलना हिंदीतल्या ‘छावा’ किंवा ‘तानाजी’सोबत करतील, पण एक लक्षात घ्या त्या सिनेमांचं बजेट आणि स्क्रीन्सची संख्या खूप मोठी होती. तरीही, अस्सल मराठी भाषेत ‘राजा शिवाजी’ने जो बेंचमार्क सेट केलाय ना, तो तोडणं कठीण आहे. लोकांना अजय-अतुलचं संगीत खूप जबरदस्त आवडलं… जेव्हा सिनेमात ‘शिवबा’ हे गाणं वाजतं, तेव्हा अंगावर काटा येतो… रितेशने दिग्दर्शन आणि अभिनय दोन्हीत जीव ओतलाय. शिवरायांच्या भूमिकेतला त्याचा वावर प्रेक्षकांना मनापासून भावलाय.

छत्रपती शिवाजी महाराज या रोलसाठी रितेश देशमुख याचं कास्टिंग

पण थोडी टीका पण होतेय. सिनेमा ३ तास १५ मिनिटांचा आहे, त्यामुळे काही ठिकाणी तो थोडा स्लो वाटतो. लोकांचं म्हणणं असंय की VFX अजून थोडं ‘इंटरनॅशनल’ लेव्हलचं असायला हवं होतं. पण कथेची मांडणी इतकी भावनिक आहे की या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. तसेच काहींच्या मते छत्रपती शिवाजी महाराज या रोलसाठी रितेश देशमुख याचं कास्टिंग शोभत नाही…. पण असो सिनेमा असो कि राजकारण विरोधक असणार आणि समर्थकही असणारच…

अफजलखान भेटीचा प्रसंग काळजाला धडकी भरवणारा

दुसरी गोष्ट म्हणजे, या रणसंग्रमात हिंदीतील दिग्गज योद्धेही सामील झालेत. संजय दत्त यांनी अफजलखानाच्या भूमिकेत जो क्रूरपणा उभा केलाय, तो खतरनाक आहे. अफजलखानाच्या भेटीचा प्रसंग खूपच काळजाला धडकी भरवणारा आहे… तर अभिषेक बच्चन यांनी संभाजी शहाजीराजे भोसले यांची भूमिका अतिशय दमदारपणे केली आहे. या हिंदी कलाकारांनी मराठी संवादांची जी लडत दिली आहे, ती खरोखरच कौतुकास्पद आहे….

जेनेलियाची ‘महाराणी सईबाई’ यांची भूमिका

तर या रणसंग्रमात रितेशला साथ लाभलीय ती त्याच्या स्वतःच्या परिवाराची…. या चित्रपटात जेनेलियाची ‘महाराणी सईबाई’ यांची भूमिका खूपच छान साकारली आहे, ही जोडी केवळ खऱ्या आयुष्यातच नाही, तर पडद्यावरही तितकीच प्रभावी दिसतेय. पण विशेष आकर्षण ठरलेत ते म्हणजे रितेशचे दोन वाघ, रियान आणि राहिल… या लहान भावांनी छोट्या शिवबांच्या भूमिकेत जो निरागसपणा आणि धाडस दाखवलंय, ते पाहून प्रेक्षकही दंग झालेत.

अख्ख्या देशमुख परिवाराने या चित्रपटात जीव ओतलाय

आतापर्यंत तर रितेशच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसच्या मैदानात नुसता राडा नाही, तर प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली आहे.. पण हा विजयाचा अश्व असाच चौखूर उधळणार का? आणि वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणाऱ्या शिवपुत्रांच्या या भूमीत, राजा शिवाजी चित्रपट पुढच्या सर्व चित्रपटांना चीतपट करणार का? तुम्हाला काय वाटतंय आणि रितेश भाऊचा हा राजेशाही बाणा तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा…

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts