Thalapathy Vijay Oath Ceremony : तमिळनाडूच्या राजकारणात (Tamilnadu Politics) गेल्या काही दिवसांपासून अनेक नवनवीन TWIST आल्याचं पाहायला मिळालं. विजय थालापती (Josef Vijay) यांच्या TVK पक्षाने (TVK Party) १०८ जागा जिंकून तमिळनाडूच्या राजकारणातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता मिळवली. मात्र सत्ता स्थापनेपासून (Establishment of Power) TVK ला आकडेवारीने गाठलं. ४ मे रोजी निकाल जाहीर झाला. विजय यांच्या पक्षाने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली.
‘त्सुनामी’ निकालामुळे DMK आणि AIADMK या प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का बसला. १०८ जागेंवर मोठा विजय TVK ला मिळाला. आणि तमिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष TVK हा ठरला. ७ मे रोजी विजय यांनी मित्रपक्षांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र राज्यपालांकडून बहुमत दाखवा त्यानंतर सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं जाईल असं सांगण्यात आलं. दोन वेळा TVK च्या विजय थालापती यांनी सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल यांची भेट घेतली होती मात्र दोन्हीही वेळी शपथविधी झाला नाही.
हेही वाचा – “मी जोसेफ विजय शपथ घेतो की…” विजयच्या मंत्रिमंडळातील ९ शिलेदार…
विजय आकडेवारीच्या खेळात चार दिवस अडकला
सर्वात मोठा पक्ष ठरूनही विजयला आकडेवारीच्या खेळात चार दिवस अडकावं लागलं. कॉंग्रेस, CPI, CPI-M, imul या पक्षांनी अधिकृत पाठींबा दिला मात्र VCK ची मनधरणी करावी लागली, आणि अखेर काल VCK च्या पाठींब्यानंतर. TVK ला आकड्यांची जुळवाजुळव करण्यात TVK ला यश आले आणि आज शपथविधी सोहळा थाटात संपन्न झाला आणि. विजय थालापती हे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री झाले.
दुपारी ३ ते साडेचार वाजता ‘राहू काळ’ किंवा अशुभ प्रभावाखाली येतो
तमिळनाडूच्या राजकारणात ‘मुहूर्त’ आणि ‘नक्षत्र’ यांना मोठे महत्त्व आहे अस म्हणतात. विजय यांचा शपथविधी आज साडे तीन वाजता होणार होता मात्र विजय यांच्या ज्योतिष सल्लागारांनी शेवटच्या क्षणी काही गंभीर इशारे दिले होते. दुपारी ३ ते साडेचार हा काळ अनेकदा ‘राहू काळ’ किंवा अशुभ प्रभावाखाली येतो असे मानले जाते. नवीन सत्तेची सुरुवात अशा काळात झाल्यास सरकारमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते, असा सल्ला विजय यांना देण्यात आला होता.
दुपारी होणारा सोहळा घाईघाईत सकाळी उरकला
दुपारी होणारा शपथविधी राहूच्या प्रभावात अडकू नये, म्हणून ‘अभिजीत मुहूर्त’ किंवा सकाळी शुभ चौघडिया असतानाच शपथ घेणे फायद्याचे ठरेल, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे पद दीर्घकाळ टिकवण्यासाठी आणि प्रशासनावर पकड राहण्यासाठी सकाळी १० वाजताची वेळ ही स्थिर दर्शवणारी होती. म्हणूनच, दुपारी होणारा सोहळा घाईघाईत सकाळी उरकला गेला. काल रात्री उशिरापर्यंत ज्योतिष्यांशी चर्चा करून सकाळी १० चा मुहूर्त निश्चित झाला. ज्योतिषांच्या मते, या वेळेत घेतलेली शपथ ही सत्तेला दीर्घायुष्य देणारी आणि विरोधकांचे डावपेच उलटवून लावणारी ठरू शकते.
सत्तेची खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना ज्योतिषाची गरज?
तमिळनाडूच्या गादीवर आता थलपती विराजमान झाले आहेत. सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी त्यांनी आकड्यांची जुळवाजुळव केलीच, पण सत्तेची खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना ज्योतिषाची गरज घ्यावी लागेल का ?. १३ मे पर्यंत राज्यपाल यांनी विधानसभेत बहुमत सिध्द करण्याचे निर्देश TVK ला दिले आहेत. सरकार तर स्थापन केलं पण १३ मे पर्यंत वेळ तशीच राहणार का ? हे पाहन महत्वाच आहे तर हे ‘शुभ’ नक्षत्र तमिळनाडूच्या जनतेसाठी किती प्रगती घेऊन येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












